Mumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 103 बार 4 व्यक्तींची नाव असलेले मतदार आहेत. मुंबईत तब्बल 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्याने ऑफिसमध्ये बसून दुबार मतदारांवर काम केले जाणार आहे. 4 लाख 33 हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अश्या डुप्लीकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर गेली आहे.
मतदान केंद्र निहाय यादी 22 डिसेंबर ला जाहीर करण्यात येणार
वार्डमध्ये दुबार मतदार आहे की नाही हे फोटोग्राफ मतदार यादी टॅली करून वॉर्ड मध्ये अधिकारी कर्मचारी पाहणार आहेत. 10 डिसेंबर पर्यंत पालिकेचे कर्मचारी बीएलओ कोणाच्याही घरी जाणार नाहीत. सध्या 10 डिसेंबर पर्यंत दुबार मतदारांचे परिशिष्ट 1 भरून घेतले जाणार नाही. मतदान केंद्र निहाय यादी 22 डिसेंबर ला जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना उत्तर देत प्रारुप मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांची वार्डप्रमाणे आकडेवारी समोर आली असून 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रसारित केलेल्या यादीत 11,01,505 एवढी दुबार नावे आहेत. एस. वार्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार असून येथे 69500 दुबार मतदारांची संख्या नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर,बी वार्डमध्ये सर्वात कमी दुबार मतदारांची आकडेवारी असून बी वार्ड मध्ये 8,398 दुबार मतदार आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी आधी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 ठरली होती आणि ती पुढे ढकलत 20 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली. मुळात तुम्ही गेले 13 महिने मतदार याद्याच प्रसिद्ध केल्या नाहीत, त्यात जी यादी जी आगामी महापालिका निवडणुकांसाठी सगळ्यात महत्वाची आहे ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती घ्यायला 8 दिवस दिलेत.. हे काय आहे? मुळात तुम्ही प्रसिद्ध केलेल्या याद्या सदोष. त्यात धड कोणती माहिती नाही. बरं राजकीय कार्यकत्यांना त्यावर काम करायचं असेल तर तुम्ही ज्या याद्या प्रसिद्ध केल्यात त्या फक्त वाचण्यास योग्य. मग त्यावर काम करायचं तर त्याच्यावर काही तांत्रिक संस्कार करा त्यालाच काही दिवस लागतात. मुळात या याद्या एडिटेबल फॉरमॅट मध्ये का नाहीत? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या: