रत्नागिरी : स्वप्नातील आत्म्याच्या गूढ रहस्येनंतर रत्नागिरीमधील (Ratnagiri Crime News) खेडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवस राहिलेत, आयुष्य जगून घे. दोन दिवसांनी तुझा मृत्यू होणार, अशा आशयाच्या चिठ्ठ्या खेडमधील अनिकेत शॉपिंग मॉलच्या दुकानांसमोर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शॉपिंग मॉलमधील 25 ते 30 दुकानांच्या समोर या चिठ्ठ्या आढळल्या आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. मॉलमधील वीस ते पंचवीस दुकानांसमोर इंग्लिश भाषेमध्ये जिवे ठार मारण्याचा मजकूर लिहलेल्या चिठ्या आढळल्या आहेत. 


दोन दिवसांनी तुझा मृत्यू होणार


दोन दिवस राहिलेत, आयुष्य जगून घे. दोन दिवसांनी तुझा मृत्यू होणार, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठ्यांमध्ये लिहिण्यात आला आहे. प्रत्येक दुकानासमोर वेगवेगळ्या तारखा नमूद केल्या असून त्या दिवशी ठार मारू, असे त्या चिठ्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे. आज सकाळी दुकाने उघडण्याच्या वेळी व्यापाऱ्यांच्या ही बाब समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अशा प्रकारे चिठ्या लिहून भयावह वातावरण निर्माण करणाऱ्यांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. 


मृत व्यक्तीने स्वप्नात येऊन मागितली मदत अन्... 


दरम्यान, 17 सप्टेंबर 2024 रोजी योगेश पिंपळ आर्या (30, रा. जि. सिंधुदुर्ग, ता. सावंतवाडी) येथील आजगांव येथे राहणारा तरुण खेड पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने पोलिसांना सांगितले की, मला वारंवार स्वप्नं पडतात. खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचा मृतदेह असून तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा असं सांगत आहे. योगेश आर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पोलिसांनी या भागाची पाहणी केली होती. यावेळी भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता. पोलिसांनी घटनास्थळी पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्टया बांधत त्याला टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह खाली पडलेला आढळला. मृतदेहापासून पाच फुटावर एक कवटी सापडली होती. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपरांजवळ काळ्या रंगाचे बूट सापडले होते. मात्र याव्यतिरिक्त पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे सापडले नव्हते. मृतदेहाची अवस्था पाहता तो अनेक दिवसांपासून पडल्या अंदाज आहे.  त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांना करावा लागणार आहे. 


आणखी वाचा 


Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार