Raigad Crime : रायगड जिल्ह्यातील (Raigad Crime)  महाड (Mahad) तालुक्यातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. महिलेवर सहा वर्षे सातत्याने अत्याचार करुन तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आणि पैसे उकळणाऱ्या नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी एका मुख्य आरोपीसह चार जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


कोण आहेत आरोपी ?


या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी इमरान इब्राहिम अंतुले (रा. चांढवे, महाड ) याच्यासह सनाउल्ला पोरे, अयनान सनाउल्ला पोरे (दोघेही रा. गोरेगाव) , मैनुद्दीन हिदायत ढोकले (रा. लाडवली मोहल्ला महाड) आणि अकील अफसर फामे (रा. महाड) अशी आरोपींची नावे आहेत. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


2018 पासून महिलेवर अत्याचार 


तक्रारदार महिलेवर 2018 पासून मुख्य आरोपीद्वारे अत्याचार करण्यात आला असल्याची कबुली पीडित महिलेने यावेळी सांगितल्याने सर्वांचा थरकाप उडाला आहे. मोबाईलवर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करत या पीडित महिलेवर हे नराधम अत्याचार करत होते. त्यानंतर इतर अन्य ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत त्या बदल्यात 2 लाख 20 हजार रुपये उकळल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, चिपळूण कोर्टाचा मोठा निर्णय