Pune Crime : पुण्यातील (Pune Crime) शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील (Pune Crime) पाषाण भागातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार घडलाय. शाळेत शिपाई असलेल्या व्यक्तीनेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेतील (Pune School) शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी (Pune Crime) अटक असून त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅमेरा सुरू ठेऊन रूम मध्ये असलेल्या एका स्वीच बोर्डवर ठेवला
अधिकची माहिती अशी की, शाळेतील किचनरूम मध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थीनींचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा प्रकार (Pune Crime) पुण्यातील (Pune Crime) एका नामांकित शाळेत घडलाय. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात (Pune Crime) गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा सगळा प्रकार 6 जानेवारी रोजी घडला. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थीनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूम मध्ये असलेल्या एका स्विच बोर्ड वर ठेवला. दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला.
आरोपींच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला. मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग साठीच केला असल्याची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी (Pune Crime) गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Ganesh Munde Transfer : 'तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही', बजरंग सोनवणेंबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली
Manoj Jarange: चार दिवसांपासून अचानक ओबीसी नेते देखील बोलायला लागले; पुण्यात जनआक्रोश मोर्चाआधी मनोज जरांगे पाटलांनी तोफ डागली