पुणे : माणुसकीला काळीमा फासणारी आणि तितकीच संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. चोरीच्या संशयावरुन तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एकूण एकोणवीस आरोपींनी हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक अरुण टाक यांचाही समावेश असल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणातील 17 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यात तीन अल्पवयीन मुलांवर अमानुष अत्याचार करण्यात आलेत. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक यांच्यासह एकोणवीस नराधमांची विकृती या घटनेमुळं समाजासमोर आली आहे. तिन अल्पवयीन मुलांना नग्न करून त्यांचा लैंगिक छळ करण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रकरणातील 17 आरोपी अद्याप फरार आहेत.
काही दिवसांपूर्वी या तिन्ही अल्पवयीन मुलांना रात्रीच्या सुमारास पिंपरीच्या घाटावर आणण्यात आले. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण टाक यांच्यासह एकोणवीस जण उपस्थित होते. तुम्ही आमच्या परिसरात चोऱ्या करता, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. याच कारणावरून या सर्वांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले, बेल्टने अमानुष मारहाण केली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीतर, तर त्यांनी त्यांच्या अंगावर कुत्री सोडली. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाचं याप्रकरणात नाव आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडल्यामुळे सर्वच स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :