पुणे: अलीकडच्या काळात सातत्याने गुन्हेगारी घटनांचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खराडी परिसरात वडिलांनी आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा खून (Pune Murder News) केला आहे. चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पती आणि पत्नीमधील वाद विकोपाला गेल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी हे भयानक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चंदन नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीशी भांडण झाल्यानंतर नवरा आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला. पण रात्री उशीरापर्यंत दोघे घरी आले नाहीत. त्यामुळे पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि ऑनलाईन पेमेंटच्या मदतीने मुलाच्या वडिलांना शोधून काढले आणि हा प्रकार समोर आला. (Pune Crime news)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास स्वरुपा टिकैती ही महिला चंदन नगर पोलीस ठाण्यात आली होती. तिने तिचा साडेतीन वर्षांचा मुलगा हिंमत टिकैती हा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. सुरुवातीला पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा मुलाचे अपहरण झाल्याचा संशय होता. तेव्हा पोलिसांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता मुलगा त्याच्या वडिलांबरोबर गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वडील एका लॉजवर जाऊन झोपले होते. पोलिसांनी या लॉजचा दरवाजा तोडून माधव टिकैती याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता माधव टिकैती याने मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. माधव टिकैती याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाला चाकू भोसकून ठार मारले. माधव टिकैती याने मुलाला ठार मारल्याची कबुली दिली आहे. त्याने मुलाचा मृतदेह जिथे टाकून दिला होता, ती जागाही पोलिसांना दाखवली. यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांविरोधात हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासात पती आणि पत्नी यांच्यातील भांडणातून माधव टिकैती याने आपल्या चिमुकल्या मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे. आता पोलीस चौकशीत याप्रकरणाचा आणखी तपशील समोर येईल.


भंडाऱ्यात महिलेची शेतात हत्या, तरुणाला अटक


भात पिकाची केलेली लागवड बघण्याकरिता गेलेल्या पुष्पा बनकर (वय 37) या महिलेचा मृतदेह शेतशिवारात आढळून आला होता. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा गावाच्या शेतशिवारात उघडकीस आली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाअंती गावातीलचं संशयित आरोपी खुशाल पडोळे (वय 27) याला चौकशीसाठी ताब्यात घेवून अटक केली. मृतक महिला ही विधवा असून तिला एक मुलगी आहे. कुठल्या कारणानं महिलेची हत्या केली याचा शोध लाखनी पोलीस करीत आहे.



आणखी वाचा


लोहगड परिसरात बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला; हत्या की आत्महत्या? गूढ कायम, तपास सुरु