Pune Crime : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्रातदार विठ्ठल पोळेकर (Vitthav Polekar) यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.14) घडली होती. आपल्या गुन्हेगारीची दहशत बसावी यासाठी आरोपी बाबू भामे (Babu Bhame) याने  विठ्ठल पोळेकर (Vitthav Polekar)  यांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली आणि त्यानंतर त्यांच्या शरिराचे अनेक तुकडे करुन वेगवेगळ्या पोत्यांमध्ये भरण्यात आले. ही पोती खडकवासला धरणात (Khadakwa) टाकण्यात आली होती. पोळेकर यांच्या शरिराचे काही अवयव सापडले आहेत तर काही अजून सापडणं बाकी आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 


अधिकची माहिती अशी की, सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात गुरुवारी पहाटे 6 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तुकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.


बाबू भामे याने काही दिवसांपूर्वी विठ्ठल पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. त्यामुळं कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अशा घटनांमुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं बोललं जात आहे. 


सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करुन खुण करण्यात आलाय. गुरुवारी पहाटे सहा वाजता मॉर्नींग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. त्यानंतर आज विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तूकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आलेत. बाबू मामे याने काही दिवसांपुर्वी विठ्ठल भामे यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा दोन कोटी रूपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


लॉरेन्स बिष्णोई टोळीचा प्लॅन उघड; सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर 10 दिवसांतच रचलेला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट