Pune Crime: पुण्यात टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पुणे पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. सोनाली आंदेकर हिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला सुद्धा सोनाली सोबत नेल्याची माहिती आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या संपूर्ण आंदेकर कुटुंब पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. यापूर्वी कृष्णा आंदेकरने पोलिसांसमोर हजर झाला होता . वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आंदेकर ही पुणे पोलिसांच्या रडारवर होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सोनाली आंदेकरला ताब्यात घेतलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मुलगा गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (७०, रा. नाना पेठ) याच्यासह १३ जणांविरोधात खून व मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी आंदेकारच्या बायकोला ताब्यात घेतलं
पुण्यातील टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर हिला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आधीच आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य पोलिसांच्या ताब्यात असून आता संपूर्ण कुटुंबावरच कारवाई झाल्याचं चित्र आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सोनाली आंदेकर काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होती. अखेर दुपारी पुणे क्राइम ब्रँचने सोनाली आंदेकरला राहत्या घरातून ताब्यात घेतले. तिच्यासोबत कृष्णा आंदेकर याच्या पत्नीला देखील चौकशीसाठी नेण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या आंदेकर कुटुंबातील सदस्यांवर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
हत्येचा कट रचल्याचा आरोप
आयुष कोमकरच्या हत्येनंतर त्याच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत सोनाली आंदेकरवर थेट आरोप करण्यात आला होता. तक्रारीनुसार, आयुषच्या हत्येचा कट रचण्यात सोनाली आंदेकरचाही सहभाग होता. पोलिसांनाही त्याबाबत संशय होता आणि तपासादरम्यान पुरावे हाती लागताच पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली. विशेष म्हणजे, सोनाली आंदेकरला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. निवडणुकीसाठी तयारीही सुरू झाल्याची माहिती होती. मात्र, या खूनप्रकरणात तिचे नाव पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नातेवाईक असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे आंदेकर टोळीतील वाद अधिक चिघळला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हा आयुषच्या खुनानंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याने सार्वजनिकरित्या "कृष्णाचा शोध द्या, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल," असा दावा केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलिस ठाण्यात हजर झाला.
हत्येसाठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप
पोलिस तपासात असे समोर आले आहे की कृष्णा आंदेकरनेच मारेकऱ्यांना पिस्तूल पुरवले होते. हे शस्त्र त्याला नेमके कुठून मिळाले, फरारी असताना तो कोणत्या संपर्कात होता आणि गुन्ह्याचे पुरावे नष्ट केले का, याचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कृष्णा आंदेकर हा या खूनप्रकरणातील मारेकरी आणि कट रचणारे आरोपी यांच्यातील मुख्य दुवा आहे.
या प्रकणात अटक असलेल्यांची नावे
बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे आणि सुजल मिरगू. आता पोलिसांनी मुनाफ पठाणला देखील अटक केली आहे.