Shardiya Navratri 2025 : नवरात्रीमध्ये (Navratri 2025) नवदुर्गेची निवड ही मार्कंडेय पुराणातील दुर्गासप्तशती (चंडी पाठ) आणि कालिका पुराण यानुसार झाली आहे. यामध्ये आदिशक्तीच्या नऊ स्वरूपांचा उल्लेख आढळतो आणि त्यावरूनच नवरात्रातील 9 दिवसांना त्या-त्या देवीची पूजा केली जाते. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

शास्त्रीय आधार

दुर्गासप्तशती (मार्कंडेय पुराण, अध्याय 81–93)

येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिगुणात्मक शक्तींचे विविध रूप वर्णन केले आहे.
त्यातील नऊ शक्तिरूपे नवदुर्गा म्हणून स्वीकृत आहेत.

कालिका पुराण आणि तंत्रशास्त्र

येथे देवीच्या विविध उपासना पद्धती, तांत्रिक साधना, आणि उर्जेचे स्वरूप सांगितले आहे.
त्यातून प्रत्येक रूप विशिष्ट तत्त्व किंवा ऊर्जा दर्शवते.

नवदुर्गा आणि त्यांचे तत्त्व

शैलपुत्री – स्थैर्य, साधेपणा आणि पर्वतरूपी अचल श्रद्धा.
ब्रह्मचारिणी – तप, संयम, आत्मशक्ती.
चंद्रघंटा – धैर्य, शौर्य, शत्रुनाशक ऊर्जा.
कूष्मांडा – सर्जनशक्ती, सृष्टी निर्माण करणारी उर्जा.
स्कंदमाता – मातृत्व, करुणा, पालनपोषण.
कात्यायनी – विवाहसुख, प्रेमसंपादन, राक्षसवध.
कालरात्रि – अज्ञान नाश, भयाचा नाश, काळावर विजय.
महागौरी – पवित्रता, शांती, सौंदर्य आणि क्षमाशीलता.
सिद्धिदात्री – सर्व सिद्धी प्रदान करणारी, पूर्णत्व आणि मोक्ष.

निवडीचे कारण

या नऊ रूपांतून मानवजीवनाचा पूर्ण प्रवास दिसतो :
श्रद्धा व तप (1–2)
धैर्य व सर्जन (3–4)
पालन व संरक्षण (5–6)
अंधाराचा नाश (7)
शुद्धता व पूर्णत्व (8–9)
 
म्हणूनच नवरात्रात हीच नऊ रूपे शास्त्रानुसार पूजली जातात.
 
डॉ. भूषण ज्योतिर्विद