पालघर : एका पोलीस कर्मचाऱ्याकडून लाच घेणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील (Palghar) अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वर्ग  1  (सरकारी वकील) सुनील बाबुराव सावंत यांना 7000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडून हुतात्मा स्तंभाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. सावंत हे गेल्या सात वर्षांपासून पालघर येथील नायालयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते.


पालघर जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक यांच्यावर सन 2015 मध्ये तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 3/ 15 कलम 376 भादंविप्रमाणे दाखल होता. जून 2023 मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोषमुक्त करण्यात आले होते. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने पदोन्नतीसाठी अर्ज केला होता. त्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पालघर त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता. तो अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यासंबंधी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोड करण्यात आली आणि 7000 रुपये लाचेची रक्कम ठरवण्यात आली. ती रक्कम स्वीकारताना  लाच लुचपत प्रतिबंधक  विभागाकडून हुतात्मा स्तंभा जवळ रंगेहाथ पकडण्यात आले.


या सापळा पथकात  दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक, शिरीष चौधरी, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार अमित चव्हाण,  पोलीस हवालदार संजय सुतार,  पोलीस हवालदार नवनाथ भगत,  पोलीस हवालदार नितीन पागधरे,  पोलीस हवालदार योगेश धारणे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी आणि पोलीस शिपाई जितेंद्र गवळी यांचा समावेश होता. 


अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून अत्याचार, पीडिता 6 महिन्यांची गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस


अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून अत्याचार सुरु असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पालघरमधून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना पालघरच्या मनोर पोलीस ठाणे हद्दीत समोर आली आहे. 


अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून अत्याचार


14 वर्षाची गतीमंद अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनोर पोलीस ठाणे हद्दीतील आकेगव्हाण या परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. दिलेल्या फिर्यादीनंतर मनोर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी गतिमंद असल्याने आरोपींच हे कृत्य समोर आलं नव्हतं. मात्र, मुलगी गरोदर असल्याची बाब समोर येताच, यामागचं हे सत्य उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे.