मुंबई : भारताच्या विविध विमानतळावर कधी आई आजारी आहे तर कधी वडील आजारी आहेत तर कधी आपल्या अमुख ठिकाणी जायचं आहे मात्र सामान चोरल्यामुळे तिकीट आणि पैसे नाही असे सांगून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या तरुणाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. या तरुण आरोपीचे नाव मोडेल वेंकटेश दिनेशकुमार (वय 22 )असून मोडेल वेंकट हा आंध्र प्रदेश येथील गुंटूरचा राहणार आहे. विमानतळावर भावनिक कारणं सांगून लोकांकडून तो पैसे घ्यायचा आणि घरी गेल्यावर पैसे परत देतो असे सांगायचा. मात्र पैसे मागण्यासाठी ही लोकं जेव्हा मोडेला वेंकटला फोन करायची तेव्हा तो त्यांची टिंगल उडवायचा तर कधी दुर्लक्षित करायचा.
मोडेला वेंकट दिनेशकुमारने दिल्ली,बेंगलोर,चेन्नई, मुंबई अशा विविध विमानतळावर लोकांकडून खोटी कारण सांगून पैसे उकळले आहेत. आई आजारी आहे ,मेडिकल कॉलेजची फी भरायची आहे, सामान टॅक्सीमध्ये विसरल्याच सांगत मोडेल वेंकटने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. साधा आणि अगदी भोळा वाटणारा मोडेल वेंकट लोकांना आपल्या गोड बोलण्यामध्ये आधी फसवायचा आणि पैसे परत करतो म्हणून सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि लंपास व्ह्याचा.
मोडेला वेंकट याच भिंग तेव्हा फुटला जेव्हा 1 जानेवारी रोजी वर्धा येथे राहणारे रघुनंदन ठाकरे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागपूरला जात होते. त्यावेळी मोडेल वेंकट त्यांच्या जवळ आला आणि त्याने रघुनंदन यांना सांगितलं की त्याला परीक्षेसाठी चंदीगडला जायचं आहे आणि त्याची फ्लाईट चुकली असून त्याला दुसर तिकिट काढण्यासाठी 7500 रुपयांची गरज आहे. माणुसकीच्या नात्याने ठाकरे यांनी 7,500 रु मोडेला वेकटला दिले.काही दिवसांनी जेव्हा ठाकरे यांनी आपले पैसे मागण्यासाठी मोडेल वेंकटला फोन केला तेव्हा तो ठाकरे यांची टिंगल करू लागला आणि ठाकरे यांच्या आपली फसवणूक झाल्याचं लक्ष्यात येण्यास वेळ नाही लागला.
16 जूनला जेव्हा रघुनंदन ठाकरे प्रवासाकरीता मुंबई विमानतळावर गेले तेव्हा त्यांनी बॅकेज बेल्ट जवळ एका व्यक्तील संशयस्पद हालचाली करताना पाहिलं. ठाकरे यांनी जेव्हा लक्ष देऊन त्या व्यक्तीला पाहिलं तर तो मोडेल वेंकट होता ज्याने काही दिवसांपूर्वी त्यांची फसवणूक केली होती. ठाकरे यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला आणि क्षणाचा ही विलंब न करता पोलीस त्या ठिकाणी पोहचले. मोडेल वेंकट याची ओळख करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले...
चौकशी मध्ये समोर आलं की मोडेल वेंकट हा सराईत गुन्हेगार असून देशाच्या विविध विमानतळावर त्याने अशी खोटी कारण सांगून 13 व्यक्तींची फसवणूक केली असून त्यांच्या कडून 1 लाख 73 हजार 367 रुपये लुबाडले आहेत. लोकांना फासवलेल्याची संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली असून पोलिसांनी लोकांना आव्हान केलं आहे की ज्या कोणाची अशी फसवणूक झाली असेल त्याने पोलिसांशी संपर्क साधावा.
मंजुनाथ शिंघे परिमंडळ 8 पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर सिल्वटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहार पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती नलावडे,पोलीस शिपाई संदीप पवार आणि हेमराज पाटील या पथका कडून हा तपास करण्यात येत आहे.