Neerav Modi PNB Case: यूकेमध्ये 2019 पासून तुरुंगात असलेल्या नीरव मोदी (Neerav Modi) याच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची प्रत्यर्पणाविरोधातील पुनर्विचार याचिका High Court of Justice (किंग्स बेंच डिव्हिजन, लंडन) यांनी फेटाळली. न्यायालयाने नमूद केले की, प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी आवश्यक “अपवादात्मक परिस्थिती” आढळत नाही.
यूकेच्या Crown Prosecution Service आणि सीबीआयच्या पथकाने जोरदार युक्तिवाद केला. नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात सुमारे 6498 कोटींच्या फसवणुकीसाठी वॉन्टेड आहे. किंग्स बेंच डिव्हिजन यांनी त्याने दाखल केलेली एक्स्ट्राडिशन (प्रत्यर्पण) आदेशाविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. सीबीआयच्या विशेष पथकानेही महत्त्वाची भूमिका. सीबीआयचे तपास अधिकारी सुनावणीसाठी विशेषतः लंडनला गेले होते. 2018 पासून त्याच्या प्रत्यर्पणासाठी प्रक्रिया सुरू आहे. 2019 मध्ये यूकेमध्ये अटक झाल्यानंतर न्यायालयांनी त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली होती आणि आधीच्या सर्व अपीलही फेटाळली होती. (Neerav Modi PNB Case)
नीरव मोदीच्या भारतात प्रत्यर्पणाचा मार्ग अधिक मोकळा- (Neerav Modi PNB Case)
नीरव मोदीने याचिकेत भारतात परतल्यास गैरवर्तन (ill-treatment) होण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या हमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र न्यायालयाने हे मुद्दे ग्राह्य धरले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, ऑगस्ट 2025 मध्ये या प्रक्रियेतील तात्पुरता कायदेशीर अडथळाही दूर करण्यात आला होता. सध्या नीरव मोदी 19 मार्च 2019 पासून यूकेच्या तुरुंगात आहे. या निकालामुळे नीरव मोदीच्या भारतात प्रत्यर्पणाचा मार्ग अधिक मोकळा झाला असून, भारत सरकार आणि सीबीआयच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
नीरव मोदी 2019 पासून ब्रिटिश तुरुंगात कैद- (Neerav Modi PNB Case)
सीबीआय (CBI) 2018 पासून नीरव मोदीला भारतात परत आणण्याचे प्रयत्न करत आहे. पंजाब नॅशनल बँकेची (PNB) सुमारे 6498 कोटींची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नीरव मोदीला 2019 मध्ये युकेमध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो एका ब्रिटिश तुरुंगात कैद आहे. ब्रिटिश न्यायालयांनी त्याच्या प्रत्यार्पणाला यापूर्वीच मंजुरी दिली असून, त्याच्या अनेक याचिकाही फेटाळण्यात आल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय? (Neerav Modi PNB Case)
नीरव मोदी प्रकरण हे भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक मानले जाते. निरव मोदी हा एक हिरे व्यापारी असून त्याच्यावर पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये सुमारे 13,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा 2018 साली उघडकीस आला, ज्यात बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट Letter of Undertaking (LoU) जारी करून परदेशातील बँकांकडून कर्ज उचलण्यात आले. हे व्यवहार बँकेच्या अधिकृत प्रणालीमध्ये नोंदवले जात नव्हते, त्यामुळे अनेक वर्षे हा फसवणुकीचा प्रकार सुरू राहिला. प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच निरव मोदी भारत सोडून पळून गेला आणि नंतर तो यूकेमध्ये आढळून आला. त्याच्याविरोधात सीबीआय आणि ईडी यांनी गुन्हे नोंदवले आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. 2019 मध्ये त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. सध्या त्याचा प्रत्यार्पण खटला यूके न्यायालयात सुरू असून, भारत सरकार त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. या घोटाळ्यामुळे बँकिंग क्षेत्रातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता व नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
PNB घोटाळा प्रकरणात CBI ची मोठी कामगिरी; नीरव मोदीच्या साथीदाराला कैरोत ठोकल्या बेड्या
