Ram Navami Wishes 2026 : हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, चैत्र शुद्ध नवमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस रामनवमी (Ram Navami)म्हणून देशभरात साजरा करतात. त्यानुसार, आज  देशभरात रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमी हा हिंदू धर्मातील पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी मित्र परिवाराला, नातेवाईकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदाच्या रामनवमीला तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये रामनवमीनिमित्त संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता.

रामनवमी शुभेच्छा संदेश 2026 (Ram Navami Wishesh in Marathi)

ज्यांचं कर्म धर्म आहे,ज्यांची वाणी सत्य आहे,त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे...रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्रांकडूनकारण त्यांच्यासारखा राजा,मातृ-पितृवचनी पुत्र आणिएकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही...रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखाकृष्ण आवश्यक आहे,तसाच प्रत्येकाच्या मनातमर्यादा पुरुषोत्तमराम असणं आवश्यक आहे…रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!

उद्धार होईल त्याचा जो घेईल प्रभूचे नावजय जय जय श्रीरामरामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!

 

अयोध्याचे वासी राम,रघुकुळाची ओळख राम,पुरुषांमध्ये आहे उत्तम राम,सदा जपावे हरीचे नाम,रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटाचा त्याग कर, सत्याची कास धर...अरे मानवा जरा प्रभू रामांच्याविचाराची कास धर...रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,भक्तांना देता वरदान तुम्ही...देव तुम्ही, हनुमान तुम्ही,अडचणींना दूर करणारे तुम्ही...रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तरआयुष्यात कायम सुखी राहाल...रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

चैत्रमास, त्यात शुद्ध नवमि ही तिथीगंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती!दोन प्रहरीं कां ग शिरीं सूर्य थांबलाराम जन्मला ग सखी राम जन्मलारामनवमीच्या शुभेच्छा!

श्रीरामाचा वंशज आहे, गीता माझी गाथा आहे,छाती ठोकून सांगतो, भारत माझी माता आहे...रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

हाताने केलेलं दान आणि मुखाने घेतलेलं श्रीराम प्रभूचं नाव कधी व्यर्थ जात नाही...रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                      

Ram Navami Wishes 2026 : राम जन्मला गं, सखे राम जन्मला... रामनवमीच्या मित्र परिवाराला द्या खास मराठीतून शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस PHOTOS