Satara Crime Update: साताऱ्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे(Phaltan Suicide) मोठी खळबळ उडाली आहे. भाऊबीजेच्या दिवशी फलटणच्या एका नामांकित हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने PSI गोपाळ बदने, प्रशांत बनकर, खासदार, यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता पोलिसांना गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन सापडलंय. डॉक्टर तरुणीवर अत्याचार करणाऱ्या गोपाळ बदने या आरोपीचे शेवटचे लोकेशन पंढरपूरमध्ये सापडल्याचं समोर आलं आहे. पंढरपूर आणि बीडमध्ये पोलीस गोपाळ बदनेचा शोध घेत आहेत. गोपाळ बदने हा बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी असल्याचं कळतंय . (Phaltan Doctor girl Suicide news)
फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या खोलीमध्ये डॉक्टर तरुणीने गुरुवारी (23 ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास आत्महत्या केली .तरुणीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने प्रशांत बनकर आणि एका खासदाराचा उल्लेख केला होता .या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन करून सविस्तर माहिती घेत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला तात्काळ निलंबित केले होते . कालपासून गोपाळ बदने फरार झालेला आहे . पोलिसांचे पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाल्या असून पंढरपुर आणि बीड परिसरात त्याचा शोध सुरू आहे .
Phaltan women suicide case: गोपाळ बदनेचे शेवटचे लोकेशन सापडले
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदने याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे . मूळचा बीड जिल्ह्यातील परळीचा असलेला गोपाळ बदने कालपासून फरार आहे .पोलिसांची पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत .दरम्यान आरोपी गोपाळ बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपूर भागात सापडल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे .पंढरपूर आणि बीड भागात आरोपीचा शोध घेतला जातोय .
नेमके प्रकरण काय ?
सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री (23 ऑक्टोबर ) रुग्णालयाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली . आत्महत्या पूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता .यामध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती .
पीडित महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते .याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या .फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांचे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि महाडिक यांनी सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती .त्यानंतर चौकशी समिती समोर पोलीस अधिकाऱ्यांवर महिला डॉक्टरने अनेक गंभीर आरोप केले होते .
हेही वाचा: