Shani Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) दंडाधिकारी तसेच न्यायदेवता म्हणतात. असं म्हणतात की, शनि प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. यासाठीच शनिचं राशी परिवर्तन किंवा संक्रमण ज्योतिष शास्त्रात फार महत्त्वाचं मानलं जातं. सध्या शनि देव मीन राशीत वक्री (Shani Vakri) अवस्थेत विराजमान आहेत. जून 2026 पर्यंत शनी याच राशीत स्थित असणार आहेत. पण, 138 दिवस वक्री चाल चालल्यानंतर शनि 28 नोव्हेंबरला मीन राशीत मार्गी होणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, शनिची मार्गी चाल फार लाभदायी मानली जाते. शनिची मार्गी चाल म्हणजेच शनीची उलटी चाल सोडून शनी सरळ चाल चालतात. त्याचबरोबर, शनिच्या मार्गीमुळे अनेक राशींच्या जीवनात प्रगतीचे दार उघडतील. त्यांच्या जीवनात स्थिरता येईल. तर, नोव्हेंबर महिन्यात शनीच्या मार्गी चालीने कोणकोणत्या राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

शनीच्या मार्गी चालीमुळे मेष राशीच्या लोकांच्या मेहनतीला चांगलं यश येईल. या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागतील. काम करण्याच्या नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, आर्थिक बाबतीत तुमच्या आयुष्यात स्थिरता राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांची या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांची मोठ्या अडचणीतून सुटका होईल. तसेच, तुमच्या कामात प्रगतीचे संकेत आहेत. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. जोडीदाराबरोबर तुमच्या नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. तसे, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी देखील शनीच्या मार्गीचा चालीचा परिणाम लाभदायक ठरणार आहे. काळात तुमचे अनेक दिवासांपासून रखडलेले प्रोजेक्ट्स तुम्हाला पूर्ण करता येतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, कुटुंबियांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळून तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला जास्त प्रवास करावा लागेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य