ठाणे : ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील शाहू महाराज विद्यालयाच्या दहावीच्या मुलांच्या दोन गटात शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा खून झाल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात मृत्युमुखी पडलेला आणि आरोपी असलेले सर्वच अल्पवयीन आहेत. आरोपींपैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक जण अजूनही फरार आहे. भरदिवसा झालेल्या या खळबळजनक घटनेमुळे नागरिक देखील भयभीत झाले आहेत.


अज्ञानी चोर! चोरलेले साडेआठ लाखांचे हिरे खोटे समजून दिले फेकून, अटकेनंतर प्रताप उघड


तुषार साबळे(15) हा ज्ञानेश्वर नगर इथे राहणारा आणि शाहू महाराज विद्यालयात दहावीत शिकणारा विद्यार्थी होता. त्याचे वडील गोरख साबळे हे ठाणे परिवहन विभागात चालक म्हणून काम करतात. शाळा नुकतीच सुरू झाल्याने आज सहा महिने परीक्षेचा पेपर देण्यासाठी तुषार शाळेत गेला होता. आधीच शाळेच्या मैदानावर खेळण्यावरून विविध तुकडीतील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात शाब्दिक बाचाबाची झालेली होती. त्याचेच पडसाद मंगळवारी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या समोरील आवारातच उमटले. टपली मारण्यावरून दोन विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी सुरू झाली. या हाणामारीत तुषार साबळे हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला. मात्र रागाच्या भरात ज्याला मारायचे होते त्याला न मारता तुषारलाच भोकसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना अटक केलेली आहे. तर त्यांचा एक साथीदार अजूनदेखील फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तुषार हा दोन बहिणींचा भाऊ आणि साबळे दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा असा दुर्दैवी प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नाही म्हणून भरदिवसा प्रेयसीची हत्या, नांदेडमध्ये प्रियकर गजाआड


इन्शुरन्सचे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी मनोरुग्णाची सर्पदंश देऊन हत्या, अहमदनगरमधील धक्कादायक घटना