धनबाद, झारखंड : 'प्रेम म्हणजे प्रेम असतं', ते व्यक्त करणं गरजेचं नसतं असा सूर अनेकदा आळवला जातो. पण प्रेमप्रसंगात (Love) अनेकदा प्रेम नसतं.. आकर्षण असते... कधीकधी डोळ्यात हवसही असते. अशा प्रेमसंबंधाचा शेवट कधीकधी भयंकर होतो. झारखंडमध्ये अशीच एक धक्कादायक घटना (Crime News) उघडकीस आली आहे. धनबादमध्ये एका 44 वर्षीय व्यक्तीनं 22 वर्षीय युवतीचा खून केला. हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचं तपासात समोर आलेय. दोघेही एकाच कार्यलयात काम करत होते. दोघांमध्ये प्रेम जडलं, दोघांमध्ये काहीवर्ष प्रेमसंबंध होते. पण नंतर ब्रेकअप झालं. मुलीनं लग्न केलं. लग्नानंतर त्या व्यक्तीनं मुलीचा खून केला.
44 वर्षाचा व्यक्ती, 22 वर्षाची मुलगी -
धनबादमधील श्रीराम प्लाजामध्ये टाटा म्युचुअल फंडच्या कार्यलयात मॅनेजर असणारा 44 वर्षीय निरज आनंद याचं 22 वर्षीय निशा कुमारी हिच्यासोबत अफेअर होते. निशा कुमारी कॅम्पुटर ऑपरटेर म्हणून काम करत होती. काही वर्षांपर्यंत दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण निशाच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुले निशाने कुटुंबाच्या मर्जीनं लग्न केलं. त्यामुळे तिने ऑफिसला जाणं बंद केले. लग्नानंतर ती नवऱ्याच्या घरी गेली. निशाचं लग्न झालं, पण निरज तिला विसरला नाही.
मॅनेजर पसार, संशय बळावला -
निशा कुमारीच्या वडिलांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी निशा माहेरी आली होती. रविवारी ती मैत्रीणीच्या लग्नाला जायचं म्हणून शॉपिंगला गेली होती. तिला बँकमोडवर सोडलं होतं. पण रात्री झालं तरी ती घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी टाटा म्युचुअल फंडच्या कार्यलयात निशाचा मृतदेह मिळाला. दीपक भगत यांना आपल्या मुलीच्या आणि मॅनेजरच्या संबंधाबाबत माहिती होतं. मुलीचा खून मॅनेजर निरजनेच केल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं. निशाच्या हत्यानंतर निरज पसार आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त संशय बळावला.
निरजला बेड्या-
पोलिसांनी निशाच्या खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर निरज याचा शोधही सुरु केला. सोमवारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. डीसीपी अरविंद कुमार यांनी सांगितलं की, निशा कुमारी हिची हत्या टाटा म्युचल फंडच्या ब्रँच मॅनेजरनेच केली. दोघांमध्ये असलेले प्रेमसंबंध हेच हत्याचं प्रमुख कारण आहे. दोघांमध्ये निशाच्या लग्नानंतरही वाद झाला होता. निशा हिला निरजने भेटायला बोलवलं होतं. रविवार असल्यामुळे ऑफिसमध्ये कुणीच नव्हतं. तिथेच चाकूने भोकसून तिचा खून केला, त्यानंतर फरार झाला.