बरेली : मामीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे (Love) भाच्या मामाचा काटा काढल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मामीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे भाच्याने मामाची हत्या केल्याने खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्येमध्ये भाच्याला त्याच्या मित्रानेही साथ दिल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ह प्रेम एकतर्फी नव्हतं तर, मामी ही भाच्याच्या प्रेमात असल्याची बोललं जात आहे. 


भाच्याकडून मामाची हत्या


बरेलीमधील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. मामी आणि भाचा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले होते. मामी आणि भाचा यांच्यासोबत त्याचा मित्र या सर्वांनी मिळून मामाला संपवण्याता घाट घातला. त्यानंतर मामाला बेशुद्ध अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर झोपवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 


मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध


मामी आणि भाच्याचे लग्नाआधीच प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही यांच्यातील संबंध कायम होते आणि त्यांनी मामाचा काटा काढायचं ठरवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या मानलेल्या भाच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून पतीच्या हत्येचा कट रचला. भाच्याने त्याच्या मित्रासोबत मिळून मामाची हत्या केली. महिलेने तिचा प्रेमी आणि प्रेमीच्या मित्रासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. पतीच्या हत्येनंतर महिला प्रेमीसोबत राहण्याच्या विचारात होती. मात्र, त्याआधीच या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.


नक्की प्रकरण काय?


आरोपीने चौकशीत पोलिसांना सांगितलं की, मृत रामवीरची पत्नी आरतीचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. लग्नानंतर रामवीर तिच्या मार्गात आला, त्यामुळे आरतीने कट रचून पतीची हत्या केली. प्रेमी मानवेंद्र आणि त्याचा मित्र सौरव याने आरतीचा पती रामवीर याला पार्टीच्या बहाण्याने बोलावले. त्यांनी रामवीरला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजली. रामवीर बेशुद्ध झाल्यावर त्याला रेल्वे रुळावर फेकलं. यानंतर रेल्वेची धडक बसून रामवीरचा मृत्यू झाला. हा गुन्हा केल्यानंतर आरती आणि मानवेंद्र एकत्र राहू लागले. रामवीरच्या मृत्यूप्रकरणी पोलीस तपासात हा कट उघडकीस आला.


एसपी ग्रामीण म्हणाले की, फतेहगंज पूर्व येथील मृत रामवीरच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचा भाचा मानवेंद्र, आरोपीचा मित्र सौरभ आणि मृताची पत्नी आरती या तिघांना अटक करण्यात आली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Pakistan : बापलेकीच्या नात्याला काळीमा! बापाकडूनच पोटच्या मुलीवर 3 महिने लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीनं नराधम वडिलांवर झाडली गोळी