Maharashtra Akola News Updates : अकोला : राज्यातील (Maharashtra News) सातही औष्णिक विद्युत केंद्रातील (Thermal Power Station) वीजनिर्मिती (Power Generation) सलग तिसऱ्या दिवशी प्रभावीत झाली आहे. त्यामुळे, राज्यातील वीज संकट वाढण्याची शक्यता आहे. सातही औष्णिक विद्युत केंद्रातून सध्या क्षमतेच्या 50 टक्केच वीजनिर्मिती केली जाणार आहे. पाऊस (Monsoon Updates), ओला कोळसा आणि दुरुस्तींच्या कामामुळे सातही केंद्रातील वीजनिर्मिती प्रभावित झाली आहे. 9540 मेगॅव्हॅटची क्षमता असताना सध्या फक्त 4732 मेगाव्हॅट वीजनिर्मिती या औष्णिक विद्युत केंद्रातून केली जात आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यावर भारनियमनाची टांगती तलवार आहे. 

महाराष्ट्रात एकूण सात औष्णिक विद्युत केंद्र आहेत. या सात केंद्रावरुन राज्यासाठी विजनिर्मिती केली जाते. परंतु, आज सलग तिसऱ्या दिवशी या केंद्रांवरील वीजनिर्मिती प्रभावित झाल्यानं राज्यातील वीज संकट गहिरं होण्याची शक्यता आहे. पाऊल, ओला कोळसा आणि दुरुस्तीची कामं खोळंबल्यानं या सातही वीजनिर्मिती केंद्रांच्या क्षमतेच्या केवळ 50 टक्केच वीजनिर्मिती सध्या सुरू आहे. आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर मात्र, राज्याला भारनियमनाला सामोरं जावं लागू शकतं. 

केंद्र  क्षमता निर्मिती
     
कोराडी 2190 1184
नाशिक 630 130
भुसावळ  1210 726
पारस  500 346
परळी 750 414
खापरखेडा  1340 819
चंद्रपूर  2920 1114
एकूण  9540 4732