नागपूर : 'नीट' (NEET) ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने पीजी हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची (Student Suicide) खळबळजनक घटना समोर आली आहे. अथर्व सत्येंद्र श्रीवास्तव असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून अभ्यासाच्या दडपणातून त्याने हे टोकचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणातील आत्महत्ये मागील नेमके कारण जरी अद्याप अस्पष्ट असले तरी एकुलता एक मुलगा गेल्याने अथर्वच्या आई वाडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.   


आई-वडिलांचा एकुलता एक आधार होता अथर्व 


अथर्व हा मूळचा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी असून तो अकराव्या वर्गात शिकत होता. तो आपल्या आकराव्या वर्गातील अभ्यासक्रमासोबतच नीट परीक्षेची देखील तयारी करत होता. मात्र तो अभ्यासात जेमतेम असल्याने त्याला या अभ्यासक्रमात फारसा रस नव्हता. अथर्व हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या चांगल्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यांला नागपूरला पाठवविण्यात आले होते. मात्र प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अथर्व दडपणाखाली असल्याने तो एकटा-एकटा आणि कोणाशीच फारसा बोलत नव्हता. अभ्यासाच्या अतिजास्त तनावाखाली त्याने हे टोकाचे पाऊल उचलेले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अथर्व हा एकुलता एक असल्याने आई वाडिलांसाठी अथर्व मोठा आधार होता. त्याने फार मोठे व्हावे आणि आपल्या आयुष्यात यश मिळवावे असे कुठल्याही आई वडिलांच्या अपेक्षा असतील, त्याच अपेक्षा अथर्वच्या आई वडिलांच्या होत्या. मात्र अभ्यासवरून आई वडिलांचे आणि त्यांचे फारसे जमत नसल्याने आईशी त्याचे वाद झाल्याची देखील प्रथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील आत्महत्ये मागील नेमके कारण जरी अस्पष्ट असले तरी एकुलता एक मुलगा गेल्याने अथर्वच्या आई वाडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.         


अभ्यासाच्या दडपणातून संपवले आयुष्य


अथर्व हा गोकुळपेठच्या ए-टू-झेड व्हेंचर पीजी हॉस्टेल मध्ये खोली क्रमांक 14 मध्ये राहत होता. अकरावीमध्ये शिकत असतानाच तो सोबत नीटची तयारीही करीत होता. प्राथमिक माहितीनुसार अथर्वला अभ्यासात फारसा रस नव्हता. अभ्यासाच्या नावाने त्याची कायम चीड-चीड होत असे. तसा तो हल्ली फारसा कोणाशी बोलत नव्हता. तसेच इतरांपासून दूर राहण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र अलीकडे त्याला कसले तरी टेंशन असल्याचे जाणवत होते.अशी माहिती अथर्वच्या मित्राने दिली आहे. तर पोलिसांच्या माहितीनुसार पोलिसांना त्याच्या खोलीतून मोठ्याप्रमाणात सिगारेटचे पाकीट,जाळालेले सिगरेटचे तुकडे आणि इतर साहित्य मिळाले आहे. कदाचित अथर्वने अभ्यासाचा अतिजास्त ताण घेतला असून त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI