NEET Exam In Kollam : नीट परीक्षेला बसण्याआधी विद्यार्थीनींना जबरदस्ती अंतर्वस्त्र काढायला लावल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली. यावर संताप आणि टीका करण्यात आल्यानंतर याप्रकरणी पाच महिलांना अटक करण्यात आली आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात आयूर येथील परीक्षा केंद्रावर तरुणींना नीट परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढण्यासाठी सक्ती करण्यात आली. अंतर्वस्त्रांसह परीक्षेला बसू देणारा नाही असं सांगत जबरदस्तीनं विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणी पीडित विद्यार्थीनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.


या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी या प्रकरणातील चौकशीचे आदेश देण्यात आले. याप्रकरणात आता पाच महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांवर आरोप आहे की, त्यांनी विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडलं. दरम्यान, परीक्षेआधीच्या तपासणीवेळी अंतर्वस्त्राच्या हुकमुळे मेटल डिटेक्टरमध्ये आवाज येत होता, यामुळे विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे.


आरोप चुकीचा : परीक्षा केंद्रावरील अधिक्षक
या सर्व प्रकरणावर परीक्षा केंद्रावरील अधिक्षक यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, विद्यार्थीनींनी लावलेला आरोप चुकीचा आहे. विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितलं नव्हतं, असं परीक्षा केंद्र अधिक्षकांचं म्हणणं आहे. परीक्षा केंद्र अधिक्षकांनी राष्ट्रीय परीक्षा एजंसीला (NTA) सांगितलं आहे की, हे आरोप खोटे असून वाईट विचारांनी करण्यात आले आहेत. तर NTAने सांगितलंय की, याप्रकरणी त्यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI