Nashik Crime Case : नाशिक : नाशिक शहरातून हत्येची आणखी एक बातमी समोर आली आहे. त्यानिमित्याने नाशिक शहर (Nashik Crime) पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. यात पंचवीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडलीय. पंचवटीतील मेरी परिसरात ही घटना घडलीय. गगन कोकाटे असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मात्र हा खून नेमका कोणी आणि कुठल्या कारणावरून केला हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या हत्येचे घटनेने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. 


तरुणाला अज्ञात मारेकऱ्यांनी संपवलं, आरोपी फरार  


नाशिक शहरात काल (20 ऑगस्टच्या) मध्यरात्रीच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय युवकाची काही आज्ञातांनी धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गगन कोकाटे असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. तर पोलिसांचं एक पथक तात्काळ संशयिताच्या मागावर पाठवले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र परत नाशिक शहरात घडलेल्या या खुनाच्या घटनेने शहर हादरले असून यातील मारेकऱ्यांना जेरबंद करणे पोलिसांच्या पुढे आता आव्हान असणार आहे.


खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे येरवडा कारागृहातून पलायन


खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पलायन केल्याचा प्रकार 19 गस्ट रोजी उघडकीस आला आहे. राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, मु पो महालगाव, ता वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. तुरुंग पोलीस शिपाई अविनाश पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू पंढरीनाथ दुसाने याला २०१५ साली वारजे माळवाडी परिसरात झालेल्या एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. या खून प्रकरणात त्याला फेब्रुवारी २०२१ मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. 2019 ऑगस्ट रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे येरवडा कारागृहातील कैद्यांची गिनती सुरू होती. यावेळी राजू दुसाने हा सापडला नाही. त्यानंतर संपूर्ण कारागृहात त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेही आढळला नाही. 


त्यामुळे अखेर कैदी क्रमांक १०५६ राजू पंढरीनाथ दुसाने हा शिक्षा भोगत असताना खुल्या कारागृहातून पळून गेल्याचे निदर्शनास आले. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाय करत आहेत.


हे ही वाचा