Nashik TCS Case Nida Khan: नाशिकमधील टीसीएस कंपनीतील (TCS) महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) हिला आज नाशिकरोड न्यायालयाने (Nashikroad Court) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निदा खानची पहिली पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Continues below advertisement

निदा खान हिच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, आजची सुनावणी देखील 'इन कॅमेरा' पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. निदा खान गरोदर असल्याने तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले जाईल अशी चर्चा होती, मात्र तिला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले.

Nashik TCS Case Nida Khan: कोर्टात नेमकं काय घडलं?

आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. विशेष म्हणजे, पोलिसांनी निदा खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यासाठी फारसा प्रयत्न केला नसल्याचे दिसून आले. निदा खान ही गरोदर असल्याने तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नसल्याचे समजते. तर पाच दिवसांच्या पोलीस कोठडी निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली आहे. आता निदा खानला तूर्तास पोलीस कोठडीतून मुक्तता मिळून तिची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (जेल) होणार आहे.

Continues below advertisement

Nashik TCS Case Nida Khan:  निदा खानच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या चौकशीत पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धार्मिक शिक्षण देत पीडितेला विशिष्ट धर्माची प्रार्थना आणि पोशाख स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे.

तपासात पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल 171 लिंक पाठवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. धार्मिक व्हिडिओ आणि ऑनलाइन सामग्रीच्या माध्यमातून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या लिंक नेमक्या कुठून पाठवण्यात आल्या याचा तपास सुरू आहे. तसेच पीडितेला विशिष्ट पद्धतीने प्रार्थना आणि वर्तन करण्यास भाग पाडल्याचेही तपासातून समोर आले आहे.

Nashik TCS Case: इतर आरोपींच्या जामिनावरही सुनावणी

एकीकडे निदा खानला न्यायालयीन कोठडी मिळाली असताना, दुसरीकडे या प्रकरणातील इतर संशयित आरोपींनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांवर थोड्याच वेळात सुनावणी होणार असून, न्यायालय त्यांना दिलासा देणार की कोठडीत ठेवणार, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Nida Khan: किराणापासून चिकनपर्यंत...सगळं घरपोच मिळायचं, 43 दिवस अंडरग्राउंड असताना निदा खानची सगळी सोय कोण करायचं?