Akshay Khanna : 'छावा ' आणि 'धुरंधर ' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे अक्षय खन्नासाठी (Akshay Khanna) 2025 हे वर्ष अत्यंत वादळी ठरलं. धुरंधरमध्ये मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीनंतर मानधनावरून आणि क्रिएटिव्ह बदलांवरून झालेल्या मतभेदांमुळे दृश्यम 3 नाकारल्याची चर्चा रंगली. एवढेच नाही तर अक्षय खन्नाच्या अनेक जुन्या मुलाखती समोर आल्या. काही नव्या मुलाखतीही आल्या ज्यात त्याच्यासोबत पूर्वी काम केलेल्या कलाकारांनी एकत्र काम केल्याच्या आठवणी सांगितल्या.  अभिनेता अक्षय खन्ना हा कायम त्याच्या शांत आणि गंभीर स्वभावासाठी इंडस्ट्रीत ओळखला जातो. पण, जर कुठे अपमान झाला तर तो शांत बसणाऱ्यातलाही नाही. अलीकडेच एका अभिनेत्याने अक्षय खन्नाच्या सेटवरील एका घटनेचा उल्लेख केला. जिथे एका चित्रपटाच्या सेटवर जेवण करताना एका कलाकाराला एकाने अडवलेलं. निर्मात्याच्या नातेवाईकाने त्याला अडवल्याचं कळताच अक्षयचा पारा चढला होता. त्याला इतका राग आलेला की त्या क्षणी त्याने यावर निर्मात्यावर आगपाखड केली होती.

Continues below advertisement

'त्या' सेटवर नेमकं काय झालेलं?

अभिनेता अमित बहलने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय खन्नाबाबत एक किस्सा सांगितला.  एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षय खन्ना आणि मुख्य कलाकार एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबले होते. पण त्याच चित्रपटातील एका छोटा सहकलाकार दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबलेला. एके दिवशी तो सहकलाकार लंचसाठी मुख्य टीमसोबत थांबलेल्या हॉटेलमध्ये आला. त्याने जेवणासाठी प्लेट उचलली आणि पहिला घास घेणार इतक्यात प्रोडक्शन टीममधील एका सदस्याने तसंह कलाकाराला अडवलं. ज्याने अडवलं तो निर्मात्याचा नातेवाईक होता. तो सगळ्यांसमोर म्हणाला ' सर तुम्ही हे खाऊ शकत नाही, तुम्ही इथले पाहुणे नाही आहात ' हे ऐकून टकला करायला खूप वाईट वाटलं तो प्लेट बाजूला ठेवून एका बाजूला जाऊन बसला.

अक्षय खन्ना हे सगळं लांबून पहात होता. एरवी शांत आणि अबोल राहणाऱ्या अक्षयचा पारा या सगळ्या प्रकाराने चढला. त्याने निर्मात्यालाच यावरून झापलं. कोणताही चित्रपट तुमच्याकडे किती ताट आहेत किंवा तुम्ही किती जेवण करता यावर बनत नाही.तो लोकांच्या आशीर्वादाने बनतो ' असं म्हणत एकाच वाक्यात अक्षयने निर्मात्याची बोलती बंद केली. अक्षय खन्ना आपल्या सह कलाकारांचा किती आदर करतो हे या प्रसंगाने सगळ्यांनाच कळलं. असं अभिनेता अमित बहल याने या मुलाखतीत सांगितलं.

Continues below advertisement

अक्षय खन्नाचे आगामी सिनेमे 

धुरंधर मधून अफाट लोकप्रियता आणि यश मिळाल्यानंतर अक्षय खन्ना त्याच्या तेलुगु पदार्थासाठी सज्ज आहे. महाकाली चित्रपटा व्यतिरिक्त अक्षय खन्ना इतका नावाच्या आणखी एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये दिया मिर्झा, तिलोत्तमा शोम आणि संजीदा शेख यांचा समावेश आहे. हा चित्रपट थेट नेटफिक्स वर प्रदर्शित होईल.