Nashik TCS Case: टीसीएस नाशिक प्रकरणी (Nashik TCS Case) राष्ट्रीय महिला आयोगाने सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सादर केला आहे. यावेळी आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर आणि प्रभावी कारवाईचे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिले. 

Continues below advertisement

मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा 18 आणि 19 एप्रिल रोजी नाशिक दौरा करणार आहेत. पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. 50 हून अधिक पानांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून अहवालात 25 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत. कार्यस्थळी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि न्याय सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविल्या आहेत. आता राज्य सरकारकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

निदा खानला 11 मेपर्यत पोलीस कोठडी- (Nashik TCS Case)

नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला (Nida Khan) 11 मेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आज पासून तिची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान नाशिक पोलीस काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. धर्मातर प्रकरणात निदाचा प्रत्यक्ष काय रोल होता. 25 मार्च निदा खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हापासून निदा कुठे होती? कोणाकोणाच्या संपर्कात होती? मुंब्रा, मुंबई, भिवंडी याभागात तिला कोणी आश्रय दिला? मतीन पटेलचा संबंध कधीपासून होता , मतीन पटेल आणि निदा खानची ओळख कशी आणि कोणाच्या माध्यमातून झाली? निदा खानचे मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन काही आहे का? मलेशियातील इम्राचा आणि निदाचा काही संबंध आहे का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं एसआयटी शोधणार आहेत.

Continues below advertisement

MIM नगरसेवकाचे 'कनेक्शन' उघड- (Nida Khan Nashik TCS Case)

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे निदा खानला लपवण्यासाठी MIM नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केली होती. मतीन पटेलने दोन महिन्यांपूर्वीच कौसर पार्क येथे एक घर विकत घेतले होते, याच घरात त्याने निदा आणि तिच्या कुटुंबाला (आई, वडील, भाऊ आणि आत्या) आश्रय देण्यात आला होता. पोलिसांनी मतीन पटेलचा मोबाईल जप्त केला असून, त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

जामीन फेटाळला अन् 'गेम' उलटला- (Nida Khan Nashik TCS Case)

दरम्यान, निदा खानने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच प्रकरणात अटकेत असलेले इतर आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांचीही चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

संबंधित बातमी:

Nashik TCS Case Nida Khan Arrested: साध्या वेशातील पोलीस, विनाचिन्हांकित गाड्या अन् रात्री छापा; TCS प्रकरणातील मास्टरमाइंड निदा खानच्या अटकेची इनसाईड स्टोरी