Nanded News Updat : महाराष्ट्र - तेलंगणा राज्य सीमेजवळ भोकर तालुक्यातील किनी जवळ एका बंद राईस मिलमधील जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकलीय. या कारवाईत 17 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून 16 लाख 82 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
भोकर पोलिसांना तेलंगणा सीमेवर जुगार चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी जुगार खेळत असलेल्या 17 जणांना अटक करण्यात आली. तर घटनास्थळावरून पोलिसांनी 16 लाख 82 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईने जुगाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
Nanded News Updat : दोन्ही राज्यातील प्रतिष्ठित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
भोकर तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या शिवारात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्डा सुरु झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी अनेत जण तेथे जुगार खेळत अल्याचे आढळून आले. तेलंगणा आणि महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती, व्यापारी आणि बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले आहेत. या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Nanded News Updat : नक्की काय झालं?
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामधील महाराष्ट्र- तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या शिवारात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिलमध्ये जुगार अड्डा सुरु झाला असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून भोकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद बाचेवाड, ज्ञानेश्वर सरोदे, चंद्रकांत आर्किलवाड, सय्यद मोईन, विकास राठोड, प्रकाश वावळे आणि महिला पोलिस नायक सिमा वच्छेवार यांच्या पथकाने 27 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी किनी गावच्या बंद राईस मिलमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सापळा रचून धाड टाकली. घटनास्थळी तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती आणि बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळताना घटनास्थळी मिळून आले. यावेळी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी या जुगार अड्ड्यावर करवाई केली या कारवाईत जुगाऱ्यांकडून रोख 1 लाख 600 रुपये, 16 किमती मोबाईल, 7 दुचाकी आणि एक चारचाकी वाहनासह जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 16 लाख 82 हजार 770 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
Nanded News Updat : यांना केली अटक?
संजीव रेड्डी ( रा. किनी ता. भोकर ) या जुगार अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीसह संतोष खलशे (रा. दहेगाव), गणेश कदम ( रा. निघवा), श्रीनिवास जाधव (रा. रंजणी) ,राजकुमार बालिजापल्ली, आनंद राठोड (रा. डोडरणा ) अंकाम रा.भोशी, मल्लेश नारडे (रा. कुबेर), बालाजी घोसालवाड (रा. बोळासा), विठ्ठल गोपवाड (रा. गोडसरा), देविदास येनकुसाब (रा. निघवा), गजराज पळसे (रा. पळशी), सत्यनारायण शिंदे (रा.दहेगाव), सुरेश ठाकूर (रा.पळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण तेलंगणा राज्यातील आहेत. तर श्रीनिवास कदम (रा. लगळूद), गोविंद जाधव (रा. महागाव), दिलीप जाधव (रा. लगळूद ) अशी अटक करण्यात आलेल्या नांदेड लांकांची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालविणाऱ्या बंद राईस मिलच्या मालकासह वरील 17 जुगाऱ्यांविरुद्ध जुगार कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.