नांदेड : माहूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.माहूर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या धुऱ्यावर (बांधावर) हा मृतदेह आढळला आहे. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
नेमका प्रकार काय?
नांदेड जिल्ह्यातील हिळवणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. शेतातीलच लाकुडफाटा घेऊन हा मृतदेह जाळल्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 5 जूनच्या रात्रीच ही घटना समोर आली आहे. माहूर -किनवट या राष्ट्रीय महामार्गाशेजारी तुळशीराम राठोड यांचे शेत आहे.या शेतात रात्री मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने राठोड हे शेताकडे आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सर्व आग विझल्यावर त्या ठिकाणी अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत दिसल्याने त्यानी माहूर पोलीसांना माहिती दिली.
बांगड्या, जोडव्यांशिवाय अन्य पुरावा आढळला नाही
या घटनेची माहिती होताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेत घेतली. घटनास्थळाची पोलिसांनी माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले आहेत. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा तेथे आढळून आलेला नाही. या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत. हा घातपात होता की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या गटनेमुळे सध्या हिळवणी या गावात तणावाची स्थिती आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कुजलेल्या स्थितीत आढळले दोन मृतदेह
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील काटेपूर्णा जंगलातही अशीच धक्कादायक घटना घडली. 27 मे 2024 रोजी या जंगलाच वेगवेगळ्या ठिकाणी दोन कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले होते. या मृतदेहांचा फक्त हाडाचा सापळा शिल्लक राहिलेला होता. यातील एक मृतदेह हा मंगळुरपीर तालुक्यातील जमुना खुर्द येथील 36 वर्षीय विठ्ठल खुळे यांचा होात. दोन महिन्यांपूर्वी घरगुती वादामुळे ते घरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
हेही वाचा :