पिंपरी चिंचवड: चऱ्होली येथे व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्या खून प्रकरणी फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन ऊर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर याच्यासह सहा जणांच्या (Pune Crime News) टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. चऱ्होलीत १२ नोव्हेंबरला आर्थिक वादातून गिलबिले यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी (Pune Crime News) अमित जीवन पठारे, आकाश सोमनाथ पठारे (दोघेही रा. चऱ्होली बुद्रूक), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, खेड), सुमीत फुलचंद पटेल (रा. दिघी), सोन्या लांडगे (रा. पौड) यांना अटक केली आहे. तापकीर (रा. चऱ्होली बुद्रूक) व सोमनाथ पाटोळे (रा. सोळू, खेड) हे दोघे फरार आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी यातील लांडगे वगळता इतरांवर ‘मकोका’ कारवाई केली. या आरोपींवर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.(Pune Crime News)
चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीरसह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वादातून नितीन गिलबिले या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर सातवा साथीदार माजी नगरसेवक किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर हा फरार आहे. तोच या गुन्ह्याचा मास्टर माईंड असल्याचे सांगितले जात आहे. दिघी पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या सात जणांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यातील आरोपींवर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख अमित पठारे,विक्रांत ठाकूर, सुमित पटेल, आकाश पठारे, सोमनाथ प्रकाश पाटोळे, किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर अशी कारवाई झालेल्या टोळीची नावे आहेत.(Pune Crime News)
Pune Crime News: काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आणि त्यांच्या ओळखीतील काही जण थांबलेले असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्युनर कारमधून तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह तिथेच टाकून आरोपी घटनेस्थळावरून पसार झाले.
खुनाचे नेमके कारणाच्या तपासादरम्यान तापकीर यांचे नाव आरोपींकडून समोर येत असल्याने तपासाची दिशा बदलली आहे. गुन्ह्यातील अचूक कारण, संबंध, आर्थिक किंवा वैयक्तिक वाद; तसेच तापकीर यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हस्तक्षेप याबाबत पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे. तापकीर यांचा शोध सुरू करण्यात आला असून, दिघी पोलिसांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र पथक तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. तापकीर अद्याप फरार आहे.