Nagpur News नागपूर : नागपूर-अमरावती रोडवरील धामणा या परिसरात असलेल्या चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत (Chamunda Explosive Company) आज भीषण स्फोट (Nagpur Blast) झाल्याची घटना घडली. या स्फोटात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही जखमी कामगारांवर सध्या उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. या भीषण स्फोटानंतर कंपनी मालक फरार झाला आहे. तर स्फोटकं तयार करणाऱ्या या कंपनीत आग विझवण्यासाठी लागणारे मूलभूत उपकरणं देखील उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


परिणामी या स्फोटानंतर परिसरात जमलेल्या कामगारांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत नागपूर-अमरावती हा राष्ट्रीय महामार्गावर अडवून धरला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून संतप्त जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केला मात्र,  निष्पाप कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेने नागरिकांचा तीव्र रोष उमटताना दिसत आहे.   


स्फोटानंतर स्थानिक आक्रमक


नागपूरच्या चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोटके तयार कंपनीमध्ये आज दुपारच्या सुमारसा मोठा स्फोट झाला. या स्फोटत आतापर्यंत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात चार महिला आणि दोन पुरुषाचा समावेश  असल्याची माहिती पुढे आली आहे. तर इतर 5 कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्तही हाती आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की लगेच  या कंपनीमध्ये आग लागली. त्यानंतर उपस्थितांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने हे प्रयत्न अपयशी ठरलेत.


तसेच या कंपनीमध्ये आग विझवण्यासाठी लागणारे मूलभूत उपकरणं देखील उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे आग लागल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत न आल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्याघडीला नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून तपासाअंती यातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे मत व्यक्त केले आहे.


दोषींवर कठोर कारवाई व्हावी- अनिल देशमुख


डोंबिवली एमआयडीसीतील दुर्घटना ताजी असताना नागपूरात देखील स्फोटाची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर अशाच पद्धतीचा मोठा स्फोट यापूर्वी देखील नजीकच्या सोलर या स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीती झाला होता. यावेळी अनेक कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. हा स्फोट झाल्यानंतर कुणीही जबाबदारी घेऊन वेळीच पुढे न आल्याने कामगारांचा मृत्यू झाला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या आणि निष्पाप कामगारांचा हाकनाक बळी घेणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे. या अपघतानंतर  त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, यावेळी ते बोलत होते.


इतर महत्वाच्या बातम्या