नागपूर: उपराजधानी नागपूर शहरात एकापाठोपाठ एक हत्यांचे (Nagpur Crime News)सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील पाच दिवसांत चार खुनाच्या घटनेने शहर हादरले. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी (Crime News) विश्वात कायदा आणि पोलिसांचा (Nagpur Police) धाक संपला आहे का, असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे. शहरात वेगवेगळ्या हत्येचे हत्यासत्राचे उदाहरण ताजे असतांनाच शहरात आणखी दोन वेगवेगळ्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे गेल्या 24 तासात या थरारक घटना घडल्याने उपराजधानी पुन्हा एकदा हादरली आहे.  


24 तासात दोन हत्येच्या घटना 


नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी दोन वेगवेगळ्या हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यातील पहिल्या घटना ही जुना गडगंज परिसरात घडली आहे. ज्यामध्ये पेशाने ट्रक ड्रायवर असलेल्या सचिन नामक व्यक्तीची त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार सचिन हा दर्शन रविंद्र भोंडेकर यांच्याकडे ट्रक ड्रायवर म्हणून काम करत होता. शुक्रवारच्या सकाळी सचिन कामवर न आल्याने दर्शनने त्याच्या राहत्या घरी जाऊन तपास केला असता, दर्शन झोपून असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर दर्शनने सचिनला कामावर येण्यास सांगितले. दरम्यान, त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. दरम्यान या मारमारीत सचिन खाली पडला आणि त्याला जबर मार बसला. त्यात तो अल्पावधीतच रक्तबंबाळ झाला. हे बघून घाबरलेल्या दर्शनने सचिनला दवाखान्यात नेले. मात्र उपचार करण्यापूर्वीच सचिनचा वाटेत मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


किरकोळ वाद विकोपाला 


अशीच एक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संघर्षनगर झोपडपट्टीजवळ घडली आहे. पैशांच्या तसेच दारू पिण्याच्या वादातून नीरज भोईर (30) आणि त्याच्या मित्र विशाल राऊत (32) यांचे यांच परिसरात राहणाऱ्या विलास वानखेडे सोबत वाद झाला. त्यानंतर विलास याने आपल्या भाऊ निखिल वानखेडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने नीरज आणि विशालवर हल्ला केला. अचानक केलेल्या हा हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामध्ये ते दोघेही निपचित जमिनीवर बराच वेळ पडून राहिले. मारेकऱ्यांचा असा समज झाला की यांच्या यात मृत्यू झाला आणि त्यांनी घटना स्थाळावरून पळ काढला. मात्र थोड्यावेळात त्यांना जाग आल्याचे पाहून परीसातील नागरिकांनी नीरज आणि विशाल याला दवाखान्यात नेले. मात्र यात उपचार सुरू करण्यापूर्वीच निरजचा मृत्यू झाला तर विशालची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. 


पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच नंदनवन पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू करून अल्पावधीतच विलास वानखेडे आणि त्याचा भाऊ निखिल वानखेडे याला अटक केली. या सोबतच फरार  मारेकऱ्यांचा देखील पोलीस शोध घेत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nagpur Crime News: शहरात हत्यासत्र सुरूच! पाच दिवसांत चार खून; उपराजधानीत चाललंय तरी काय?