Nagpur News : नागपुरातील (Nagpur) वर्धा रोडवर निर्जन रस्त्यावर एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावरुन झाडी झुडूपांच्या निर्जन रस्त्यावरून महाविद्यालयकडे जात असताना अज्ञात आरोपीनं कुऱ्हाडीचा धाक दाखवत पीडित विद्यार्थिनीला झाडी झुडुपात ओढून नेत तिच्यावर अत्याचार केला. काल (5 ऑक्टोबर) दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्यापही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पीडित विद्यार्थिनी काल दुपारी सुट्ट्यानंतर आपल्या घरातून परतली होती. महाविद्यालयात जाण्यासाठी उशीर झाल्यामुळं ती शॉर्टकट रस्त्यानं महाविद्यालयाकडे जात असताना अज्ञात आरोपीनं तिचा पाठलाग सुरु केला. त्यावेळेस पीडित तरुणी फोनवर आपल्या कुटुंबीयांसोबत बोलत होती. पिडीतीने एक संशयास्पद व्यक्ती माझा पाठलाग करत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. मात्र, ती काही करु शकेल याच्या आधीच आरोपीने तिला कुऱ्हाडीचा धाक दाखवत झुडुपात ओढत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांचे अनेक पथक त्याचा शोध घेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune News : विसर्जन मिरवणुका सुरु होत्या, लिफ्ट देण्याच्या बहाणा करून थेट लॉजवर घेऊन गेला अन् नंतर...