Nagpur Crime News: नागपूर : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur News) हिंगणा तालुक्यात (Hingna Taluka) एका 11 वर्षांच्या मुलाला मांजर चावल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मांजरीने चावा घेतल्यानंतर काही तासांत त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्रेयान्शु क्रिष्णा पेंदाम, असं या मुलाचं नाव आहे. संध्याकाळी मित्रांसोबत खेळताना मांजरीनं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पायाचा चावा घेतला, असं त्यानं आईला सांगितलं. त्यानंतर काही वेळातच मुलाची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मांजर चावल्यानंच श्रेयान्शुचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.
संपूर्ण हिंगणा तालुक्यात श्रेयान्शुच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाचा मृतदेह पोस्टमार्टसाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणासंदर्भात हिंगणा पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मुलाच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उखळी गावात एका 11 वर्षीय बालकाला माजरीने चावा घेतल्यानंतर काही तासात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्रेयान्शु क्रिष्णा पेंदाम (वय 11) असं मुलाचं नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील उखळी येथे शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मुलगा आपल्या काही मित्रांसोबत खेळत होता. सायंकाळी 6 वाजता तो घरात आला. खेळत असताना मांजरानं त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पायाचा चावा घेतला, असं आईला सांगितलं. त्यानंतर काही वेळानं त्याला मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. त्याचे आईवडील त्याला घेऊन डिंगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्स रुग्णालयात हलविण्यात आला. हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणूक, श्रीमंत बनण्याची लालसा; एका फटक्यात वृद्धानं गमावले 1.12 कोटी