Nagpur Accident News : नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये एक भीषण अपघात (Accident News) झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात  ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्ध्यातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झालाय. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स बस जंगल घाटामध्ये आली असता बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या अपघातात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही विद्यार्थी जखमी झाले असल्याचीही माहिती पुढे आली आहे. 


मिळालेल्या माहिती नुसार ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती समोर येते आहे. वर्ध्यात ट्रेंनिगसाठी हे विद्यार्थी गेले होते. दरम्यान वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना  नागपूर- वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका घाटामध्ये हा अपघात झालाय. यात  एका विद्यार्थीनीचा मृत्यू तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. तर अनेक विद्यार्थी यात जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरच्या एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


दोन दुचाकींची अमोरा-समोर आल्याने जोरदार धडक, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू


गोंदिया तालुक्यातील रावणवाडी-अर्जुनी दरम्यान रस्त्यावर दोन वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमध्ये एकूण 5 जण प्रवास करत होते. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या तिघांवर गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. महेंद्र ठाकरे (35) रा. चिचगाव, रेखलाल पटले (50) रा. मध्यप्रदेश असे दोन्ही मृतांची नावे आहेत.   


धुळ्यातील सुभाष नगर परिसरात घंटागाडीने चिमुकल्याला चिरडले


धुळ्यातील सुभाष नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने शौर्य मयूर बडगुजर या दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात शौर्य मयुर बडगुजर जागीच ठार झाला आहे. दरम्यान जूने धुळे परिसरातील नागरिक आणि शौर्याच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहन चालकाला ताब्यात घेतल असून याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


हे ही वाचा