मुंबई : एटीएममधून पैसे डिपॉझिट करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करुन त्यांच्याकडे असलेल्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दोन आरोपींना कुरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ज्या ठिकाणी एटीएम मशीनमध्ये सुरक्षारक्षक नसायचे आणि तिथे येणारा व्यक्ती हा ज्येष्ठ नागरिक असेल त्या ठिकाणच्या एटीएमपाशी हे आरोपी जाळे टाकून पैसे हडपायचे.  नागरिक सीनियर सिटीजन असायचं. 


कुरार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी परिसरामध्ये राहणाऱ्या किशोरी लाल अमृतलाल बिस्सा ( 60 वर्ष ) मलाड पूर्वेत बँक ऑफ इंडिया च्या ATM मध्ये 7 जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एक लाख रुपये जमा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तीन जण त्या एटीएम जवळ होते. एक जण एटीएमच्या आतमध्ये होता तरी दोन जण एटीएमच्या गेटसमोर बाहेर उभे होते. 


जेव्हा किशोरीलाल पैसे डिपॉझिट करत होते, तेव्हा त्याच वेळी एटीएमच्या आत मध्ये उभा असलेला व्यक्ती किशोरीलाल यांच्या मदतीला गेला. त्याने मदतीच्या बहाण्याने पहिला पैसे किशोरीलाल यांच्या अकाउंट मध्ये जमा केले. नंतर किशोरीलाल बाहेर गेल्यावर ते ट्रान्झिशन कॅन्सल केले आणि जमा करण्यासाठी आणलेले सर्व पैसे एटीएम मधून बाहेर काढले. रक्कम मिळताच हे तिघे आरोपी फरार झाले. 


आपल्या खात्यावर पैसे आलेच नसल्याचं समजताच किशोरीलाल यांना आपल्याला फसवलं गेल्याचं लक्षात आलं. त्यांनी थेट पोलिसांत जाऊन तशी तक्रार नोंदवली. पोलिसांनी एटीममध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे कुरार पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.


महत्वाच्या बातम्या :