Mumbai Crime News: एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अटक (Arrested) केली आहे. हा निवृत्त पोलीस अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलीसह फरार झाला असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. मुंबईतील साकीनाका (Sakina Mumbai) परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


रिलायन्स कंपनीत एचआर विभागात काम करणारी 28 वर्षीय सोनाली सदाफुले हिने 14 डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या दिवशी आतिशचा विवाह सोहळा पार पडला होता. आत्महत्येच्या वेळी तिने सुसाइड नोट लिहिली. या सुसाइड नोटमध्ये तिने आपल्या आत्महत्येसाठी निवृत्त डीसीपी बापू काटकोंड आणि त्यांचा मुलगा आतिश काटकोंडसह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जबाबदार धरले आहे. त्यानंतर निवृत्त डीसीपीच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. मात्र, परंतु डीसीपी त्याच्या कुटुंबासह फरार असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. 


आरोपी आतिश काटकोंड आणि सोनाली सदाफुले यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, सोनाली आणि आतिशच्या लग्नासाठी आतिशच्या कुटुंबियांकडून लग्नाच्या हुंड्यात 25 लाखांची मागणी करण्यात आली होती. एवढा मोठ्या रक्कमेचा हुंडा देण्यास सोनालीच्या कुटुंबियांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे हा विवाह झाला नसल्याचा आरोप सोनालीच्या कुटुंबियांनी केला. तर, दुसरीकडे आतिषच्या कुटुंबियांनी त्याचा विवाह दुसऱ्या मुलीशी लावून दिला. त्यामुळे दुखावलेल्या सोनालीने आत्महत्या केली. सोनालीने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. या पत्रात तिने सर्व गोष्टींचा उल्लेख केला असून आतिष काटकोंड आणि त्याच्या कुटुंबीयांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी निवृत्त डीसीपी बापू काटकोंडस, त्यांची पत्नी स्मिता कटकधोंड आणि आतिषची बहीण श्रुती काटकोंड यांचा शोध सुरू केला आहे. 


हुंडा मागणे, हुंडा देणे आणि स्वीकारणे याला कायद्याने  बंदी आहे. मात्र, कायद्याचे रक्षक म्हणून सेवा बजावलेल्या या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. इतकंच नव्हे तर हुंड्याच्या मागणीमुळे एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले.  सोनालीच्या आत्महत्येमुळे सदाफुले कुटुंब आणि तिच्या आत्महत्येमुळे लग्नाच्या काही दिवसात आतिषला अटक झाल्याने त्याची पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या घटनेमुळे दोन तरुणींचे कुटुंब उद्धवस्त झाले असल्याची चर्चा साकीनाका परिसरात सुरू आहे. 



इतर महत्त्वाच्या बातम्या: