Lalbaug Women Murder Case : लालबाग परिसरात मुलीनेच आईची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आता नवीन अपडेट समोर आली आहे. काळाचौकी पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशमधून एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उत्तर प्रदेशमधून एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाला आता उत्तर प्रदेशहून (Uttar Pradesh) मुंबईमध्ये आणलं जातं आहे. लालबाग (Lalbaug) परिसरात 23 वर्षीय मुलीने आईची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले. या प्रकरणामुळे परिसरात चांगली खळबळ उडाली आहे. प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.


लालबाग (Lalbaug Crime News) येथील इब्राहिम कासम इमारतीमधील विणा जैन (वय 53 वर्षे) यांची त्यांचीच मुलगी रिंकल जैन (वय 23 वर्षे) हिने हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात आईची हत्या केल्यानंतर मुलगी रिंकल लालबागमधल्याच एका सँडविच विकणाऱ्या तरुणाच्या संपर्कात होती असं तपासात समोर आलं. या आधारे पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना हा उत्तर प्रदेशमध्ये संशयित तरुण सापडला आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन संशयित तरुणाला ताब्यात घेतलं. आता या संशयित तरुणाला मुंबईत आणून त्याची चौकशी केली जाणार आहे.


नक्की घटना काय?


लालबाग परिसरातील इब्राहिम कासम इमारतीमधील विणा जैन (55) या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भाऊ आणि भाचीने पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता महिलेच्याच घरात मृतदेहाचे तुकडे कुजलेल्या अवस्थेत सापडले. तपासावरून विणा जैन यांची मुलगी रिंकल जैन हिने आईची हत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. आईची निर्घृण हत्या करून तिने मृतदेहाचे तुकडे केले. हत्येनंतर मृतदेह कुजायला लागल्यावर आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून आरोपी मुलीने 100 परफ्युम आणि एअर फ्रेशनरच्या बाटल्या खरेदी केल्या.


पोस्टमॉर्टमनंतर कळेल मृत्यूचं कारण


मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकल जैनच्या घरात सापडलेला कुजलेला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रुग्णालयात शवविच्छेदनाचा आहवाल आल्यावर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. पोस्टमार्टम रिपोर्टवरून वीणा यांची हत्या कशाप्रकारे करण्यात आली याचा उलगडा होईल. तसेच मृतदेहाचे सीटी स्कॅनही करण्यात येणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mumbai Crime : लालबागमध्ये आईचा खून केल्यानंतर मुलीने सुमारे 100 परफ्यूम आणि एअरफ्रेशनर खरेदी केले होते, चौकशीत माहिती समोर