Subodh Bhave: अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याची 'ताज' ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली.  आता "संत तुकाराम" या आगामी हिंदी चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा "तुकाराम महाराज" यांची भूमिका साकरणार आहे. नुकताच सुबोधनं त्याचा "संत तुकाराम" (Sant Tukaram)  या चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो "तुकाराम महाराज" यांच्या भूमिकेत दिसत आहे. हा फोटो शेअर करुन सुबोधनं त्याच्या "संत तुकाराम"  या हिंदी चित्रपटाची माहिती दिली. 


सुबोध भावेची पोस्ट


सुबोध भावेनं (Subodh Bhave) "संत तुकाराम" (Sant Tukaram) या चित्रपटाबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं,  'आज "संत तुकाराम" या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील "तुकाराम महाराज" यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आदित्य ओम यांचा मी कायमचा ऋणी आहे. तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे. ती यथावकाश कथन करीन. माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखीलिया!'


सुबोधच्या पोस्टला सेलिब्रिटींनी केल्या कमेंट्स


सुबोध भावेच्या पोस्टला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटींनी  "संत तुकाराम" या आगामी चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेता जितेंद्र जोशीनं सुबोधच्या पोस्टला कमेंट केली, 'खूप छान दिसत आहेस आणि काम तर उत्तमच केलं असणार यात शंका नाही. उत्सुक आहे मित्रा.' तर स्वप्निल जोशीनं कमेंट केली, 'मनापासून शुभेच्छा मित्रा'






'ताज' या सीरिजमध्ये त्यानं बिरबल ही भूमिका साकारली. या सीरिजमधील सुबोधच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले.  सुबोधसोबतच धर्मेंद्र, अदिती राव हैदरी आणि आशीम गुलाटी, ताहा शाह, शुभम कुमार मेहरा, राहुल बोस या कलाकारांनी 'ताज डिव्हायडेड बाय ब्लड' या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकरली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Subodh Bhave : 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला सात वर्ष पूर्ण; सुबोध भावेने केली नव्या सांगीतिक सिनेमाची घोषणा