Mumbai Crime News : मुंबईच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे (Andheri West Vidhan Sabha) भाजप आमदार अमित साटम (Amit Satam)  यांच्या नावाने मतदारसंघातील व्यक्तीला मेसेज करून त्याच्याकडे पैशाची मागणी करत फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे समोर आले आहे. अमित साटम यांच्या मतदारसंघातील परिचयाचे चैतन्य नाईक यांना 17 एप्रिल रोजी मोबाइलवर मेसेज करण्यात आला होता. इतकच नाही तर नाईक यांच्या मोबाइलवर या आरोपीने मेसेज करत आपण साटम यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे ही सांगितले. तसेच पुढे बोलत असताना स्वत:चे नाव सेहगल असे सांगितले. कालांतराने त्याने नाईक यांच्या खात्यावर आणखी एक बँक डिटेल्स असलेला मेसेज केला, यावेळी त्याने शैक्षणिक मदती करता 25 हजार रुपयांची मागणी केल्याचे ही पुढे आले आहे.  

Continues below advertisement

अज्ञाताकडून शैक्षणिक मदती करता 25 हजार रुपयांची मागणी

दरम्यान, नाईक यांना संशय आल्याने त्यांनी थेट अमित साटम यांना फोन केला असता, कोणीतरी आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर नाईक यांनी जुहू पोलीस ठाणे गाठले. जुहू पोलीस ठाण्यात नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र हा व्यक्ती कोण आणि त्याने या पूर्वी असेच आणखीन काही प्रकार केले आहेत का? या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहे. 

 FIR ऑन दि स्पॉट " योजनेचा नागरिक घेतायत लाभ

बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी जनतेच्या सुविधांसाठी अनेक योजना व सुविधा सुरू केल्यात. यात महिलांसाठी आकस्मित ॲप , एफ आय आर ओन् दि स्पॉट अशा योजनांचा आता नागरिकांना थेट लाभ मिळत आहे. विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून एफ आय आर ओन्ली स्पॉट या योजनेचा वृद्ध नागरिक संकटात सापडलेल्या महिलांना मोठा फायदा होत असल्याचा समोर आला आहे.  गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील चार ज्येष्ठ नागरिक व महिलांनी एफ आर आय ऑन दी स्पॉट योजनेचा लाभ घेत आपल्या तक्रारी घरबसल्या दाखल केले आहेत. यात जळगाव जामोद पोलीस स्थानकांतर्गत 24 तासात एका महिलेला आरोपीला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात यश मिळालय.

Continues below advertisement

अनेकदा पोलिसांवर एफ आय आर नोंदवत नसल्याने टीका होत असते.  मात्र आता जे नागरिक पोलीस स्थानकात पोहोचू शकत नाही असे वृद्ध नागरिक व संकटात सापडलेल्या महिलांना त्या आहेत त्या ठिकाणावरून एफआयआर नोंदवता येणार आहे. एक फोन कॉल केल्यानंतर पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचून संबंधितांची तक्रार घेणार आहे.  त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे व तीही अगदी कमी वेळात.

इतर महत्वाच्या बातम्या