Mumbai Crime News : मुंबईच्या वरळी सी-फेसवर एक खळबळजनक घटना घडली आहे. यात हातातील छत्री लागल्याच्या रागातून 35 वर्षीय व्यक्तीने महिलेच्या पाठीत काचेचा तुकडा खुपसल्याचा (Crime News) प्रकार समोर आला आहे. शनिवारी(19 एप्रिल) वरळी सीफेस परिसरात ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून चक्क महिलेवर हल्ला केल्यानंतर जखमी महिलेला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी (Mumbai Crime) दिली असता याप्रकरणी पोलिसांनी शोध मोहिम राबवून पाच तासांत आरोपीला अटक केली. मात्र क्षुल्लक कारणातून एका गर्दुल्ल्याने महिलेच्या पाठीत चक्क काचेचा तुकडा खुपसल्याच्या घाटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी शोध मोहिम राबवून पाच तासांत आरोपीला अटक
पुढे आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास महिला अनिता बाळू पाटकर या वरळी सीफेस परिसरातील जे के कपूर चौक या ठिकाणाहून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या हातातील छत्री तेथील एका व्यक्तीला लागली. त्या रागातून व्यक्तीने त्याच्या हातात असणाऱ्या काचेच्या तुकडा महिलेच्या पाठीत खुपसला. याप्रकरणी महिलेच्या मुलगा संदीप बाळू पाटकर याने वरळी पोलिसांकडे तक्रार केली. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असता आरोपी प्रेमनगर येथे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तेथे छापा टाकून आरोपी सचिन भगवान अवसरमोल(35) याला अटक केली. सचिन हा छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील रहिवासी आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास वरळी पोलीस करत आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकची तीन वाहनांना धडक
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने तीन वाहनांना धडक दिली असून यात दोघांचा जागीच मृत्यू तर काही प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक निघाला होता. तेंव्हा ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यावेळी पहिली धडक समोरच्या चारचाकीला बसली, तर नंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या म्हणजे पुण्याला निघालेल्या दोन वाहनांना ही ट्रकची ठोकर बसली. बोरघाटातील वाघजाई मंदिराजवळ साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर चालकाने ट्रक डोंगराच्या दिशेने घेतला अन सुदैवाने ट्रक थांबविण्यात यश आलं. त्यामुळं पुढील दुर्घटना टळली.
इतर महत्वाच्या बातम्या
