Investment Plan : जर तुम्ही गुंतवणुकीद्वारे (Investment ) तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन (Financial planning) गरजेचं आहे. गुंतवणुकीच्या जगात काही साधे नियम आहेत जे तुम्हाला विशिष्ट परताव्यासह किती वेळात तुमचे पैसे किती पटींनी वाढतील याचा अंदाज लावू शकतात. यामध्ये 72 चे नियम, 114 चे नियम आणि 144 चे नियम आहेत. गुंतवणुकीचे विविध मार्ग आहेत. दरम्यान, या नियमानुसार किती दिवसात तुमचे पैसे किती वाढतील यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
72 चा नियम वापरुन पैसे दुप्पट कधी होणार?
गुंतवणुकीसाठी (Investment ) तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील हे सांगणारा हा सर्वात लोकप्रिय नियम आहे. या नियमाचे सूत्र अगदी सोपे आहे. 72 ला वार्षिक व्याज दराने विभाजित करा. म्हणजेच 8 टक्के वार्षिक परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर 72 ÷ 8 = 9 वर्षे. म्हणजेच 1 लाख रुपये दुप्पट व्हायला म्हणजेच 2 लाख रुपये होण्यासाठी 9 वर्षे लागतील.
114 चा नियम समजून घ्या
तुमचे पैसे तिप्पट केव्हा होतील हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास, 72 ऐवजी 114 वापरा. हा नियम तुम्हाला एक पाऊल पुढे जाण्याची योजना करण्यास मदत करतो. असे समजून घ्या, वार्षिक परतावा 10 टक्के असेल तर 114 ÷ 10 = 11.4 वर्षे. म्हणजे 1 लाख रुपये 3 लाख होण्यासाठी 11.4 वर्षे लागतील.
144 चा नियम समजून घ्या
दरम्यान, आता तुमचे पैसे चौपट करण्यासंदर्भातील माहिती पाहुयात. यासाठी नियम 144 सर्वात योग्य आहे. त्यामध्ये तुमच्या योजनेचा परतावा प्रविष्ट करून, तुम्ही किती वर्षांत तुमची गुंतवणूक चौपट होईल हे शोधू शकता. म्हणजेच वार्षिक परतावा 12 टक्के असेल तर 144 ÷ 12 = 12 वर्षे. म्हणजे 1 लाख रुपये 4 लाख होण्यासाठी 12 वर्षे लागतील.
हे नियम कसे वापरायचे?
दरम्यान, तुम्ही देखील या तीन नियमांचा उपयोग भविष्यातील मूल्याचा अंदाज लावण्यासाठीच नाही तर गुंतवणूक योजना तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. म्हणजेच, जर तुमचे एखादे विशिष्ट उद्दिष्ट असेल, जसे की मुलांचे शिक्षण, घर घेणे किंवा सेवानिवृत्ती, तर या नियमांद्वारे तुम्ही ठरवू शकता की ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही किती टक्के परतावा देणाऱ्या योजनेत किती कालावधीत गुंतवणूक करावी.
महत्वाच्या बातम्या: