मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून बिहारहून मुंबईत बोलावून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजेश चौपाल असं या मृत व्यक्तीचं नाव असून आरोपी सुरेंदर मंडल याने त्याची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह सीएसटीएमच्या एका पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून त्यावर 25 किलो मीठ टाकण्यात आलं होतं. 


पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे पतीने केला तिच्या प्रियकरचा खुन केल्याची घटना घडली आहे. बिहारच्या मधुबनी येथे राहणाऱ्या सुरेंदर मंडल (वय 30) याच्या पत्नीचं गावांमधील राहणाऱ्या राजेश चौपाल या व्यक्ती बरोबर प्रेमसंबंध होते. हे प्रकरण गावकऱ्यांना कळालं आणि याचा माहिती सुरेंदर मंडलला झाली. त्यामुळे आरोपी कासावीस झाला, त्याला त्याच्या नावाची बदनामी झाल्याचा राग मनात वर्षभर होता. त्यानंतर आरोपीने एक प्लान आखला आणि गावामधीलच मित्रांच्या साहाय्याने हत्येचा कट रचला.


आरोपी सुरेंदर मंडलने आधी राजेश चौपालला मुंबईत बोलावले आणि नंतर त्याचे मित्र शंभू सदाय (वय 30) राजकुमार सदाय (य 23) आणि विजयकुमार मिस्त्री (वय 50) यांच्यासोबत मिळून त्याची हत्या केली.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे काम चालू असलेल्या बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीमध्ये राजेशचा मृतदेह टाकून दिला.


मृतदेहाची विल्हेवाट लागावी म्हणून पाण्याच्या टाकीत आरोपीने मीठ टाकून दिलं. याप्रकरणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी नोंदवली होती  जी नंतर अपहरणामध्ये बदलण्यात आली आणि नंतर हत्येमध्ये.


काय घडलं नेमकं?
14  जून रोजी राजेश बिहारमधून मुंबईला पोहचला. पण गावची ट्रेन कुर्ला स्थानकात आली तरी राजेश काही घरी पोहचला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. ही तक्रार दाखल होताच गुन्हे शाखे 5 चे प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांना माहिती मिळाली कि राजेशचे अपहरण झाले असून त्याला कुर्ल्याहून सीएसएमटी येथे बोलावण्यात आले होते. 


नायर यांनी हाच धागा पकडून आणि  खबऱ्यांचे जाळे पसरवून तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू केला. आरोपींनी राजेशला भेटायला सीएसएमटीला बोलावले होते. त्यामुळे कुर्ला स्थानकात उतरल्यानंतर राजेश टॅक्सीने सीएसएमटीला गेला. तेथे पोहचल्यानंतर आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्याला त्याच परिसरात असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर नेले. तेथे नेऊन आरोपींनी राजेशच्या डोक्यात घनाचे घाव घातले. गळा चिरला आणि त्याचा मृतदेह ओढत तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकी पर्यंत घेऊन आले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पाण्याच्या टाकीत फेकला आणि त्यावर 25 किलो मीठ टाकले. 


आरोपीने राजेशला कॉल करून सीएसएमटीला भेटायला बोलावले होते. ही माहिती प्रभारी निरीक्षक घनशाम नायर यांना मिळाली. त्यावरून पथकाने माहिती काढली असता राजेशच्या त्याच्याच गावच्या सुरेंद्रच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि तो सध्या बेपत्ता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोन पथके तयार करून एक बिहार तर दुसरे पथक कर्नाटकात पाठवले. तेथून सुरेंद्र, शंभू आणि रामकुमार तर कर्नाटकातून त्यांचा मुकादम विजय मिस्त्री याला पकडून आणून गुन्ह्याची उघडकीस आणला.


गुन्हे शाखे पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली एपीआय संजय जगताप, गणेश जाधव, अमोल माळी, महेंद्र पाटील, जयदीप जाधव, उपनिरीक्षक चिंचोलकर तसेच सोनहिवरे, न्यायनिर्गुणे,राणे आदींच्या पथकाद्वारे हा तपास करण्यात आला.


महत्वाच्या बातम्या :