Mumbai Crime News : मुंबईच्या खार पश्चिम परिसरातील रेस्टॉरंट आणि बार मालकाने दोन ग्राहकांना हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. या माहराणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खार पश्चिमेकडील आंबेडकर रोडवरील जनता बार अँड रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि वेटर यांच्यात झालेल्या किरकोळ वादावादीतून हॉटेल चालक, वेटर आणि त्यांच्या बाउन्सरकडून ग्राहकांना लोखंडी रॉड, हॉकी स्टिक आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ग्राहक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.  


खार पश्चिमेला असलेला आंबेडकर रस्त्यावरील जनता बार अँड रेस्टॉरंट पहाटेपर्यंत अवैधपणे सुरू असतो अशी माहिती मिळाली आहे. 16 जानेवारी रोजीच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या हॉटेलमधील वेटर आणि ग्राहकांमध्ये किरकोळ वाद झाला. याचं पर्यावसण जोरदार हाणामारीत झालं. हॉटेलमधील वेटर आणि बाऊन्सर्सने दोन ग्राहकांना हॉकी स्टिक, लोखंडी रोड आणि लाट्याकट्यांनी प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही ग्राहक गंभीर जखमी झाले असून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, या हॉटेलमध्ये ग्राहकांना मारहाण होण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील फेब्रुवारी 2022 मध्ये ग्राहकांना वेटरकडून मारहाण केली  होती. त्यावेळी देखील मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर झाले होते. यामुळे या हॉटेल चालकाला पोलिस आणि कायद्याचा धाक राहिला नाही का असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.


मुंबईत बार मालकांकडून ग्राहकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झालीय. आठ दिवसापूर्वी देखील अंधेरी पूर्वेकडील मेट्रो बार आणि ग्रीटिंग बार मधील वेटरकडून ग्राहकांना हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा देखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडलीय. दरम्यान, मुंबईतील सततच्या या घटनांमुळे बार शेजारील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अशा गुंडागर्दीला आळा घालण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.  


महत्वाच्या बातम्या


Mumbai Crime : दिल्लीतील चोरांचा मुंबईतील बंद घरांवर डोळा! चोरीसाठी विमानाने यायचे, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या