मुंबई : राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील दादर भागात एका व्यक्तीनं त्याच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दादरमध्ये क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी युवराज काळे याला अटक केली आहे.

Continues below advertisement

दादरमध्ये युवराज काळे वय 80 वर्ष यानं त्याचा 35 वर्षांचा मुलगा अन्वर काळे याची हत्या केल्याची घटन घडलीय. ही घटना दादरमधील सॅल्वेशन शाळेजवळ घडल्याची माहिती आहे.

हत्येचं कारण अस्पष्ट 

दादरमध्ये क्षुल्लक कारणांवरून 80 वर्षीय युवराज काळे यानं 35 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अन्वर युवराज काळे असे मृत मुलाचे नाव आहे. दादरच्या सॅल्वेशन शाळेजवळ दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला असल्याची माहिती आहे. याच वादतून राग अनावर झालेल्या युवराज काळे यानं धारधार शस्त्रांनी मुलगा अन्वर याच्यावर हल्ला केला.

Continues below advertisement

उपचारादरम्यान मृत्यू

दादरमध्ये भररस्त्यावर युवराज काळे यानं मुलगा अन्वर याची हत्या केली.या हल्यात जखमी झालेल्या अन्वरला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारा दरम्यान अन्वरचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचे वडील आरोपी युवराज काळे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी युवराज काळे याला अटक केली आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर दादर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.

इतर बातम्या :