Mumbai Crime news : मुंबईतील (Mumbai) ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा (Trombay Police Station) हद्दीत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर,प्रायव्हेट पार्टवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर अमानुष वार केले आहेत. त्यामुळं ती बेशुद्ध झाली आहे. आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन घटनास्थळावरून पळ काढली. दरम्यान, या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक 38 वर्ष याने महिलेला घरी सोडतो असे सांगितले होते. त्याच बहाण्याने आरोपी उमेश याने महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने त्या महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो पळून गेला.
दरम्यान, मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक महिलेला ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली. त्यानंतर या महिलेने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकारी तिथे आले आणि महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पीडित महिलेचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी उमेशविरुद्ध भादंविच्या कलम 376, 376 (2) (एन), 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मानखुर्द परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने आपल्या आरोपाची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नराधमाला ट्रॉम्बे पोलिसांनी केली अटक.
नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल, चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप
दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका 64 वर्षीय महिलेवर 38 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.चित्रा वाघ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची आणि तिच्या परीवाराची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेने आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीने कारवाई होत त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल हे नक्की ! कारण, महिलांची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या: