Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समलैंगिक संबंध (homosexual relationships) ठेवताना 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. एल.टी.मार्ग पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा नोंदवत निष्काळजीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी पार्टनरला अटक देखील केली आहे. 


समलैंगिक संबंध ठेवताना 55 वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याला त्याच अवस्थेत सोडून 33 वर्षीय तरुण बेशुद्ध व्यक्तीचा मोबाइल घेऊन पळून गेला. काळबादेवी परिसरात घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचरण केले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. 


मृताजवळचे दोन्ही मोबाईल न मिळाल्याने पोलिसांना आला संशय-


पोलिसांना सुरुवातीला 55 वर्षीय व्यक्तीचा अकस्मित मृत्यू झाल्याचे वाटले. मात्र मृताजवळचे दोन्ही मोबाईल मिळून न आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या दोन्ही मोबाइलचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर बोरिवलीतून 33 वर्षी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून ही बाब समोर आल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.


मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त-


मुंबईच्या सक्त वसुली संचालनालयाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या सोने तस्करीत विमानतळावरील कर्मचाऱ्याचा हात असल्याचे निदर्शनास आले आहे. सक्त वसुली संचालनालयाने 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करत 10 किलो 923 ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही 8 कोटी 47 लाख असल्याची माहिती सक्त वसुली संचालनालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसात देशात दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणाऱ्या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे.


सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी-


सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. 




संबंधित बातमी:


Crime News: गावात मित्रासोबत समलैंगिक संबंध, माऊलीला समजलं; शीर, हात, पाय कटरने कापून पोत्यात भरले!