मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत निवडणुकीआधी पैशाचं घबाड सापडलं आहे. मुंबईतून निवडणूक भरारी पथकाने  1 कोटी 87 लाखांहून अधिक रोकड जप्त केली आहे. सायन पोलीस आणि मुंबईच्या निवडणूक भरारी पथकाने मुंबईतील सायन परिसरातून एका कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून पोलिसांना 1 कोटी 87 लाख 80 हजार रुपये जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैशांसह वाहन आणि चालकाला ताब्यात घेतलं आहे. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.