मुंबई: मागासवर्गीय जातीची असल्यामुळे सासरकडच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चेंबूर येथे घडली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिस ठाण्यात मुलीच्या पतीसह सासरा, सासू आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युक्ता (20वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
सासरच्यांच्या जाचाला कंटाळूनच या विवाहितेने आत्महत्या केली असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. त्यांनी तशी तक्रार दिल्याने आरसीएफ पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती हर्षल तसेच सासू, सासरे आणि नणंदेविरोधात भादवि कलम 306, 498-अ, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युक्ता ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीत राहणाऱ्या हर्षल संकपाळ याच्याशी तिचे सुत जुळले. पण दोघांच्या प्रेमसंबंधाला हर्षलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे हर्षल आणि युक्ता यांनी लपून लग्न केले होते. युक्ता मागासवर्गीय असल्याने हर्षलच्या घरच्यांचा तिला विरोध होता. मात्र तरी हर्षलने तिच्याशी लग्न केले.
या दोघांनी लग्न केल्याचं त्यांच्या घरच्यांना समजल्यानंतर ते दोघेही चेंबूर कँम्प परिसरात एक रुम भाड्याने घेऊन तेथे ते राहू लागले. 25 जुलै रोजी या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले आणि तेव्हा हर्षलने युक्ताला मारहाण देखील केली होती. त्यानंतर 26 तारखेला युक्ता राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडली होती. युक्ता ही मागासवर्गीय असल्यामुळेच तिच्या सासरच्या लोकांनी तिला त्रास दिला आणि तिचा छळ केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला
आहे. त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचंही तिच्या घरच्यांचं मत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Wardha News : आईच्या कुशीत असणाऱ्या बाळाची चेन चोरली, चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Baramati Crime : मुलीला शाळेतून आणायला गेलेल्या वडिलांचा धारधार शस्त्राने वार करून खून, अल्पवयीन आरोपी फरार
- Amravati News : खऱ्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने; युनियन बँकेच्या लॉकरमधील तीन कोटींचे दागिने बेपत्ता