Mumbai Crime : मुंबईच्या मालाड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो सार्वजनिकरित्या व्हायरल केल्या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पीडित मुलगी ही गोरेगावच्या एका नामंकित शाळेत शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीला एका आरोपीने 1 डिसेंबर रोजी धमकावून तिच्याकडून तिचा विवस्र फोटो मागून घेतला. तो फोटो आरोपीने त्याच्या परिसरात रहात असलेल्या 19 वर्षीय दुसऱ्या आरोपीला पाठवला. त्याने तो फोटो पुढे 18 वर्षीय मित्राला पाठवला. या आरोपीने तो फोटो कॉलेजाच्या ग्रुपमधील मुलांना दाखवून पिडीत मुलीची बदनामी करत फोटो सार्वजनिक केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने बांगूरनगर पोलिसात तक्रार नोंदवली आहे. 


अल्पवयीन मुलीवर मित्रांकडून लैंगिक अत्याचार, कांदिवलीतील घटना 


मुंबईच्या कांदिवली परीसरातून एक धक्कादायक घटना घडलीये. अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावून तिच्याच तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार (Mumbai Crime) करण्यात आल्याचं समोर आलंय.  हे कृत्य करून त्याचे चित्रीकरण ही केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय.  या प्रकरणी आता 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  आरोपींविरोधात सामुहिक बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) आणि  माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sanjay Rathod: तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा; जनहित याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली