मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह (Mumbai) पुणे, ठाणे या शहरात बिल्डर्स लॉबी वाढत असून बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधिंची उलाढाल गुन्हेगारीला प्रवृत्त करताना दिसून येते. त्यातून, धमक्या, खून, अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. आता, पुन्हा एकदा मुंबईत एका बांधकाम व्यवसायिकाची दिवसाढवळ्या गोळ्या (Firing) झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार भरदिवसा विकासकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताकडून विकासकावर (Builder) 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले असून गोळीबारात विकासक गंभीर जखमी झाला आहे. 

Continues below advertisement

कांदिवली चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञाताकडून फ्रेंडी दिलीमा भाई या विकासावर गोळीबार करण्यात आला. फ्रेंडीभाई हा तरुण बांधकाम विकास आहे, ते कारमध्ये बसले असताना दोघांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी, अज्ञातांनी दोन ते तीन राउंड फायर केले, त्यामध्ये दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी

गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. जखमी तरुणाला बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, गोळीबारच्या घटनेनंतर चारकोप पोलीस आणि डीसीपी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून वेगवेगळ्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचे शोध घेत आहेत. तर, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र, मुंबई शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात, लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोघ घेतला जात आहे. 

Continues below advertisement

मनसेचा इशारा, गोळीबार रोजचाच

कांदिवली-चारकोपमध्ये गुंडांचा कब्जा असल्याचा आरोप करत मनसेनं पोलिसांना थेट अल्टिमेटम दिला आहे. कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार रोजचाच आहे. नवरात्रीत यादवचा खून, त्यानंतर शेखरवर गोळ्या, नागरिकांना धास्तावून टाकणाऱ्या सलग घटनांनी परिसर अक्षरशः दहशतीखाली आहे. चव्हाण–यादव टोळीतल्या वादातही गोळीबार झाला असून गुन्हेगार बेधडक पोलिस मात्र शांत आहेत. इथल्या “दहा घरांत तपासणी केली तर एका घरात गावठी कट्टा निघेल… चारकोपला बिहार बनवू देणार नाही,” असे मनसे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी म्हटले. पोलिसांनी तात्काळ घरोगरी तपासणी सुरू करावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून जनता संरक्षणासाठी उभा राहील, असेही त्यांनी म्हटले. 

हेही वाचा

धुळ्यातही भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद; शरयू भावसर यांची न्यायालयात धाव