धुळे : सोलापूर जिल्ह्यातील अनगर (Angar) नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपरिषदेतही भाजप नेत्या नगराध्यक्षपदी विजयी होणार असल्याचे निश्चित झालं आहे. कारण, भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्रींसह भाजपचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, नयन कुवर रावल यांची येथील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कारण, महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अंतिमता अवैध ठरवण्यात आला. तांत्रिक कारणामुळे शरीर भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, आपण न्यायालयात धाव घेत असल्याचं त्यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

दोंडाई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. मात्र, छाननी प्रक्रियेत शरयू भावसार यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी अवैध ठरवला असून तांत्रिक कारणास्तव हा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे, मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध आता शरयू भावसार यांनी कोर्टात धाव घेतली आहे. 

राष्ट्रवादीच्या भावसार यांची धुळे जिल्हा न्यायालयात धाव

दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता. शरयू भावसार यांचे वडील अॅड. एकनाथ भावसार यांची घरपट्टीची थकबाकी असल्याचे कारण पुढे करीत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याप्रकरणी आज शरयू भावसार यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली असून याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आल्याची माहिती त्यांच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपरिषदेसाठी यंदा गेल्या 60 वर्षात प्रथमच निवडणूक होणार असे चित्र होते. इथे माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्याविरुद्ध उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उज्ज्वला थिटे यांचाही अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळे, अनगर आणि दोंडाई या दोन ठिकाणच्या निवडणुकीत भाजप उमेदवार बिनविरोध झाल्याचं दिसून येतं. 

Continues below advertisement

हेही वाचा

ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला